कंधार दि : राज्यासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत . तसेच धरणे तलाव जलाशय हे देखील फुल्ल भरले आहेत . आणि अश्यामध्ये नांदेड , खुदबईनगर येथून कंधार येथील बडी दर्गाहच्या दर्शनासाठी आलेल्या ५ भाविकांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाला . ही घटना रविवार ( दि . २१ ) दुपारी एकच्या सुमारास घडली . मृत एकाच कुटुंबातील असून तलावाकाठी जेवण करण्यासाठी गेले होते . मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार ( वय ४५ ) यांचा मुलगा मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन ( वय १५ ) , सय्यद सोहेल सय्यद वाहिद ( वय २० ) , सय्यद नवीद सय्यद वाहिद ( वय १५ ) , मामा मोहम्मद विखार ( वय २३ सर्व रा . खुदबईनगर नांदेड ) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत . नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार , मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार हा नांदेड येथे बेकरी व्यवसाय करत होते . सर्व आपल्या नातेवाईक व कुटुंबासह कंधार येथील हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम ( बडी दर्गाह ) च्या दर्शनासाठी दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता आले होते . सर्वांचे दर्शन झाल्यानंतर कुटुंबातील एक महिला जेवण करण्यासाठी तलावाच्या काठावर गेले . जेवण झाल्यानंतर प्लेट धुण्यासाठी तलावाच्या काठावर गेले असता त्यातील एकाचा पाय घसरुन तलावात पडला . त्यास वाचविण्यासाठी एकएक करुन पाचही जण तलावात बुडू लागले .
यावेळी सोबत असलेल्या त्यांच्या कुटुंबातील एका महिले पाहिले असता तिने ही माहिती दर्गाहमध्ये असलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांना दिली . घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भोई समाजातील व्यक्तींच्या मदतीने पाचही मृतदेह तलावातून बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला . तात्काळ त्यांना रुग्णवाहिका व रिक्षातून कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले . मात्र , डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करुन मृत घोषित केले . त्या नंतर सर्व मृतदेह कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले . या घटनेमुळे कंधार शहरासह देगलूर नाका भागात शोककळा पसरली आहे .







0 comments:
Post a Comment