जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

31 March 2023

हाळदा येथे श्री महादेवांच्या यात्रे निमित्त कुस्तीच्या दंगली व किर्तन सोहळा

भोकर प्रतिनिधी:- तालुक्यातील मोजे हाळदा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि.०१ एप्रिल २०२३ ते दि.४ एप्रिल २०२३ दरम्यान श्री महादेवाची भव्य यात्रा भरत असून त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात कुस्तीच्या दंगली,मनोरंजनाचे कार्यक्रम व संतांची हरी कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. या यात्रेतील कार्यक्रम खालील प्रमाणे राहणार आहेत. 
दि.०१/४/२०२३ रोज शनिवार सकाळी ८ वाजता महादेवाच्या काठीची स्थापना व रात्री ९ वाजता संगीत भजनी व मोगलाई भजनी मंडळी हाळदा यांच्या भजनाचा दणदणीत कार्यक्रम राहिल. दि.०२/४/२०२३ रोज रविवार सकाळी ९.०० वाजता. श्री महादेवाचा विधीवत अभिषेक व रात्री ठिक ९ वा. ह.भ.प. अनंत महाराज कुंडकर अंजनखेड व त्यांचा संगीत संच यांचे जाहीर हरिकिर्तन.दि.०३/४/२०२३ रोज सोमवार दु.२ वा.जंगी कुस्त्यांचे सामने सुरू होतील.व रात्री ०९.०० वा. विनोदाचार्य ह.भ.प.गोविंद महाराज कल्याणकर नांदेड व त्यांचा संगीत संच यांचे हरी कीर्तन होईल. यात्रेतील कुस्त्यांची बक्षीसे खालील प्रमाणे- प्रथम बक्षीस ९००१/- समस्त गावकरी मंडळी हाळदा तर्फे, व्दितीय बक्षीस ७७७७/-श्री किरण मधुकरराव पाटील किसवे हाळदेकर यांच्या तर्फे,तृतीय बक्षीस ५५५५ श्री प्रशांत रमेशराव पाटील किसवे हाळदेकर यांच्या तर्फे, चतुर्थ बक्षीस ३०५१ /- श्री दत्ताभाऊ डोंगरे हाळदेकर (उद्योजक) यांच्या तर्फे, पंचम बक्षीस २५५१/- कै.पोशट्टी पिराजी भंडरवाड यांच्या स्मरनार्थ श्री मारोतराव पोशट्टी भंडरवाड यांच्या तर्फे व उर्वरीत कुस्त्यांचे बक्षीस कुस्ती पाहून देण्यात येईल. या कुस्त्यांच्या दंगलीत पंचाचा निर्णय अंतीम राहील त्याच बरोबर खेळाडूंच्या जिवीत्वाची जबाबदारी ज्यांची त्यांच्यावर राहील.दि.०४/४/२०२३ रोज मंगळवार रात्री महादेवाच्या काठीची नगर प्रदिक्षणा व भजनाचा दणदणीत कार्यक्रम राहील. तरी नांदेड जिल्ह्यातील व परिसरातील यात्रेकरू, दुकानदार, कुस्तीगिर मंडळी व किर्तन प्रेमी मंडळीनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने यात्रेत उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन समस्त गावकरी मंडळी हाळदा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

26 March 2023

सेवा समर्पण परिवार सदैव समाजसेवेला समर्पित- शिरीष देशमुख गोरठेकर

भोकर प्रतिनिधी:- सेवा समर्पण परिवार हा सदैव समाजसेवेला समर्पित असल्याने त्यांनी भोकर तालुक्यातील गावागावात मुलभुत विकासाची सर्व दारे खुली करून एक क्रांती केली आहे असे गौरव उदगार उमरी पंचायत समितीचे मा.सभापती शिरीष देशमुख गोरठेकर यांनी बोलताना काढले. ते भोकर येथे तहसील कार्यालयात सेवा समर्पण परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश लांडगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी विठ्ठल गीते,महंत उत्तमबन महाराज, सुभाष पाटील किन्हाळकर,राजेश्वर रेडी आदींची उपस्थिती होती.
    पुढे बोलताना त्यांनी सांगितले की सेवा समर्पण परिवाराने संपूर्ण तालुक्यात जल जंगल आरोग्य या क्षेत्रात नाविन्यपूर्ण मोलाचे काम करून तालुक्यातील २१ गावे स्मार्ट व्हिलेज बनवली. हाडोळी ग्रामपंचायतीला गावकऱ्यांच्या सहकार्यातून व श्रमदानातून आयएसओ मानांकन श्रेणी मिळून देऊन गावाला जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक मिळून दिले. तसेच कामनगाव, हासापूर,नागापूर, खडकी, नारवाट,बेंबर,पांडुरना,बोरवाडी आदी गावात सातत्याने संपर्क करून ग्रामस्थांना सोबत घेऊन स्वतः श्रमदान करून गावातील साफसफाई तशेच शाळा,अंगणवाड्या,आरोग्य केंद्र यात मूलभूत बदल सांगून लोकाभिमुख बनवल्या. त्यामुळे या सर्व बाबींचा उपयोग लोकांच्या मूलभूत उत्कर्षासाठी झाला. त्यामुळेच तालुक्यातील २१ गावे आज स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारूपाला आली आहेत. त्यांनी आपले क्षेत्र संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये वाढवून आपला जिल्हा आदर्श बनवावा असा आशावाद व्यक्त केला. यावेळी तहसीलदार राजेश लांडगे यांनीही सेवा समर्पण परिवाराच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून त्यांनी तालुक्यात ग्रामविकासाचे घेतलेले व्रत अत्यंत स्तुत्य आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष राजेश्वर रेडी लोकावाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी काळवणे सर यांनी तर आभार परिवाराचे सचिव विठ्ठल फुलारी यांनी मानले. या महारक्तदान शिबिरात सर्व क्षेत्रातील अधिकारी,कर्मचारी,राजकीय पदाधिकारी, समाजसेवक,प्राध्यापक, शिक्षक वृंद, पत्रकार बांधव व महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिले. मौजे कामनगाव येथेही आयोजित महारक्तदान शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले.

25 March 2023

राम शिंदे यांनी वेटलिफ्टींग मध्ये सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या खेळाडूचे केले स्वागत.आकाश गरुड याने प्राप्त केले सुवर्ण पदक

भोकर अंबादास के एल बोयावार 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या चंदिगढ येथील अखिल भारतीय अंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेत आयोजित वेट लिफ्टींग स्पर्धेमध्ये नांदेड येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता त्यातील एका खेळाडूने सुवर्ण पदक प्राप्त केल्याने त्या खेळाडूचे अभिनंदन करण्यात आले.
     विद्यापीठाच्या वतीने चंदिगढ येथे 13 मार्च ते 19 मार्च पर्यंत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय अंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धे अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामधील ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक खेळाडू उपस्थीत झाले होते या स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील आकाश गरुड, आशुतोष लक्ष्मण शिंदे, कृष्णा दळवी कुमार मगर, यश हलके, दुर्गेश सुर्यवंशी, शुभम श्रीनिवास या खेळाडूंसह टिम व्यवस्थापक सतीश बरकुंटे यांची ही उपस्थिती होती हे सर्व खेळाडू निवासी पूर्णा येथील असून या खेळाडूंनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत खेळाडूंनी आपली नांदेड ची यशाची परंपरा आपल्या खेळातून सिद्ध करून दाखविली आहे यामध्ये आकाश गरुड याने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेटलिफ्टिंग मेन चॅम्पियनशिप 2022 - 2023 स्पर्धेमध्ये विजेता झाल्याने सुवर्ण पदक देऊन त्यास गौरविण्यात आल्याने इतर खेळाडूसह सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्याचे चंदिगढ वरून रेल्वे ने हे सर्व खेळाडू पूर्णा रेल्व स्थानकावर परत येताच पूर्णा येथे भोकर येथील रेल्वे बुकिंग सूपरवायजर राम शिंदे, सिद्धांत राम शिंदे,श्याम शिंदे,विलास शिंदे,रमेश बरकुंटे, माजी नगरसेवक आशीष ठाकूर आदींनी सर्व खेळाडूसह टीम व्यवसथापकाचे पुष्पहार घालून अभिनंदन केले आहे.

24 March 2023

बिलोली आगारात महिला सन्मान योजनेत 20 हजार 236 महिलांनी घेतला सवलतीचा लाभ

राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेत तिकीट दरात महिलांना 50 टक्के सवलत 

नांदेड दि. :- राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात सर्व महिलांना राज्य महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत जाहिर केली आहे. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी 17 मार्च पासून सुरु झाली आहे. सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेत 17 ते 22 मार्च 2023 या कालावधीत एकूण 1 लाख 42 हजार 430 महिलांनी लाभ घेतला आहे.

या योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना ही सवलत लागू आहे. यात साधी, मिनी, निमआराम, विना वातानुकुलित, शयन-आसनी, शिवशाही, हिरकणी, शिवनेरी, शिवाई आदी बसमध्ये ही प्रवास सवलत लागू आहे. नांदेड जिल्ह्यातील 9 आगारात महिलांनी आतापर्यत पुढीलप्रमाणे महिला सन्मान योजनेत लाभ घेतला आहे.

नांदेड आगारात 20 हजार 868, भोकर आगारात 13 हजार 989, किनवट आगारात 10 हजार 372, मुखेड आगारात 17 हजार 533, देगलूर आगारात 15 हजार 728, कंधार आगारात 21 हजार 950, हदगाव आगारात 13 हजार 241, बिलोली आगारात 20 हजार 236, माहूर आगारात 8 हजार 513 असे एकूण 1 लाख 42 हजार 430 महिला प्रवाशांनी बस प्रवास दरात 50 टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0000

21 March 2023

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50000 रूपये द्या:राजमुद्राचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे

भोकर अंबादास के एल बोयावार 
भोकर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही भागात अवकाळी पाऊस पडला आहे. शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले धान्य पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50000 रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी राजमुद्राचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे यांचा जिल्हाधिकारी साहेबांकडे केली आहे. शेतकऱ्याना शासनाच्या वतीने तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे अन्यथा राजमुद्रा सामाजिक संघटना शेतकरी बांधवांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढेल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली व प्रशासनाची राहील अशी निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर राजमुद्राचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे जिल्हा सचिव श्रीकांत पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य साईनाथ पाटील गोडबोले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष केंद्रे सुप्रियाताई बेटमोगरेकर सोशल मीडिया माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील परिवार कंधार तालुका अध्यक्ष किरण गायकवाड तालुका उपाध्यक्ष गंगाधर मोरे आदींची उपस्थिती होती

सरकार गतीमान पण भोकर आगारात महीलांचा अपमान.

भोकर अंबादास के एल बोयावार 
भोकर:महाराष्ट्र शासन हे महीलांच्या उत्कर्षासाठी सदैव
तत्पर असल्याच्या कोट्यावधी रूपयाच्या जाहीराती एस.टी. बसेसवर महाराष्ट्र सरकार खर्च करत आहे परंतु भोकर आगारात प्रवाशाना साधी शौचालयाची तसेच पिण्याच्या पाण्याची देखील सुवीधा नाही व आगारात रात्रीला लाईट ची व्यवस्था देखील नाही. त्यामुळे सरकार गतिमान असले तरीही भोकर आगारात महिलाचा अपमान म्हणण्या सारखी दुर्दैवी वेळ महिला प्रवाशांवर आली आहे.
दि.18 मार्च पासून महाराष्ट्र शासनाने सर्व महिलाना प्रवाशांना बस प्रवासात 50% सुट दिल्याने महिला प्रवाशांची कमालीची वाढ होत असलेली दिसून येत आहे.भोकर बसस्थानकात महिलांची प्रचंड गर्दी वाढताना दिसून येत असून या बसस्थानकात महिलांसाठी ना स्वच्छतागृह,ना पिण्याचे पाणी,ना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था अशी दैनिय अवस्था बस स्थानकाची दिसून येत असून परिणामी महिला व पुरुष प्रवाशांना लघुशंके करीता उघडयावर जावे लागत आहे.त्याबरोबच रात्रीच्या वेळेस आगाराच्या परिसरात लाईट ची व्यवस्था नसल्या कारणाने अंधाराचे साम्राज्य दिसून येत असून रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या मनात असुक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
 
 भोकर मतदार संघ हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भोकरचे विद्यमान आमदार अशोकराव चव्हाण यांचा असुन त्यांनी भोकर तालुक्यातील विकास कामावर कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर करत आहेत तसेच तालुक्यात विकासाची कामे ही झालेली आहेत परंतु भोकर बसस्थानकामधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असुवीधा यांच्याकडे लक्ष देऊन महिला व पुरुष प्रवाशांकरीता अध्यावत असे स्वच्छता गृह,शुद्ध पिण्याचे पाणी, आगारात प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था, तसेच महिलांच्या हिरकणी कक्षात आवश्यक त्या सुविधा महिला प्रवाशांसाठी कराव्यात अशी मागणी महिला प्रवाशांकडून मोठया प्रमाणात होत आहे.

09 March 2023

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील - उत्तम बाबळे

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या भोकर तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वितरित 
प्रतिनिधि अंबादास बोयावार 
भोकर : पत्रकारिता क्षेत्रात दिवसेंदिवस पत्रकार बांधवांना विविध समस्यांसह आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.ती आव्हाने पेलत देश व राज्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ सेवारत झाला असून मराठवाड्यातील पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्थापक अध्यक्ष विजयकुमार सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सदैव प्रयत्नशील राहू,असे प्रतिपादन मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका भोकर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वितरणचा कार्यक्रम दि.८ मार्च २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाश कोल्हे,नांदेड जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकुर, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष मारोती निखारे व पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर चे तालुकाध्यक्ष जेष्ठ पत्रकार बालाजी नार्लेवाड,तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,तालुका सचिव आर.के. कदम,तालुका उपाध्यक्ष विजय चिंतावार, कमलाकर बरकमकर,सहसचिव विठ्ठल सुरलेकर,समन्वयक शुभम नर्तावार,सहकोषाध्यक्ष गजानन गाडेकर,सदस्य विशाल जाधव,अंबादास बोयावार,संभाजी कदम,निळकंठ पडवळे यांसह सर्व पदाधिकारी पत्रकार बांधवांना ओळखपत्र वितरित करण्यात आले व सर्वांचे अभिनंदन करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तर या कार्यक्रम प्रसंगी अभिनंदन व शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे म्हणाले की,सदरील पत्रकार संघ संघाची एकसंघ शक्ती मोठी असून या संघांशी अन्य २५ सामाजिक सेवाभावी कार्यकारीणी संलग्न आहेत.त्या कार्यकारिणींचा विस्तार आपण सर्वांनी करावा,असे ही ते म्हणाले.तसेच जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकुर म्हणाले की,आपल्या पत्रकार बांधवांवर अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्या विरुद्धचे सर्व गुन्हे मी माझ्यावर घेईल व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाश कोल्हे म्हणाले की,निस्वार्थ सेवाभावातून आपण पत्रकारिता करतोत त्यामुळे सक्षम कुटूंब निर्मितीत मागे पडतोय.म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ पत्रकार बांधवांच्या पत्रकारितेसोबत लघुउद्योगाची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहे.तर अध्यक्षिय समारोपात बोलतांना संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की,मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या शाखांचे विस्तारिकरण होत असून अधिकाधिक पत्रकार बांधवांनी यास सहभागी व्हावे,असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिल व निष्कलंक पत्रकारिता करुन संघटनेचे नावलौकिक जनसामान्यांत ठेविल अशी ग्वाही दिली.तर बहुसंख्य पत्रकार बांधवांची उपस्थिती असलेल्या या ओळखपत्र वितरण कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचालन प्रा.आर.के.कदम यांनी केले व उपस्थितांचे आभार गंगाधर पडवळे यांनी मानले.