जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

26 March 2023

सेवा समर्पण परिवार सदैव समाजसेवेला समर्पित- शिरीष देशमुख गोरठेकर

भोकर प्रतिनिधी:- सेवा समर्पण परिवार हा सदैव समाजसेवेला समर्पित असल्याने त्यांनी भोकर तालुक्यातील गावागावात मुलभुत विकासाची सर्व दारे खुली करून एक क्रांती केली आहे असे गौरव उदगार उमरी पंचायत समितीचे मा.सभापती शिरीष देशमुख गोरठेकर यांनी बोलताना काढले. ते भोकर येथे तहसील कार्यालयात सेवा समर्पण परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश लांडगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी विठ्ठल गीते,महंत उत्तमबन महाराज, सुभाष पाटील किन्हाळकर,राजेश्वर रेडी आदींची उपस्थिती होती.
    पुढे बोलताना त्यांनी सांगितले की सेवा समर्पण परिवाराने संपूर्ण तालुक्यात जल जंगल आरोग्य या क्षेत्रात नाविन्यपूर्ण मोलाचे काम करून तालुक्यातील २१ गावे स्मार्ट व्हिलेज बनवली. हाडोळी ग्रामपंचायतीला गावकऱ्यांच्या सहकार्यातून व श्रमदानातून आयएसओ मानांकन श्रेणी मिळून देऊन गावाला जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक मिळून दिले. तसेच कामनगाव, हासापूर,नागापूर, खडकी, नारवाट,बेंबर,पांडुरना,बोरवाडी आदी गावात सातत्याने संपर्क करून ग्रामस्थांना सोबत घेऊन स्वतः श्रमदान करून गावातील साफसफाई तशेच शाळा,अंगणवाड्या,आरोग्य केंद्र यात मूलभूत बदल सांगून लोकाभिमुख बनवल्या. त्यामुळे या सर्व बाबींचा उपयोग लोकांच्या मूलभूत उत्कर्षासाठी झाला. त्यामुळेच तालुक्यातील २१ गावे आज स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारूपाला आली आहेत. त्यांनी आपले क्षेत्र संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये वाढवून आपला जिल्हा आदर्श बनवावा असा आशावाद व्यक्त केला. यावेळी तहसीलदार राजेश लांडगे यांनीही सेवा समर्पण परिवाराच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून त्यांनी तालुक्यात ग्रामविकासाचे घेतलेले व्रत अत्यंत स्तुत्य आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष राजेश्वर रेडी लोकावाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी काळवणे सर यांनी तर आभार परिवाराचे सचिव विठ्ठल फुलारी यांनी मानले. या महारक्तदान शिबिरात सर्व क्षेत्रातील अधिकारी,कर्मचारी,राजकीय पदाधिकारी, समाजसेवक,प्राध्यापक, शिक्षक वृंद, पत्रकार बांधव व महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिले. मौजे कामनगाव येथेही आयोजित महारक्तदान शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले.

0 comments:

Post a Comment