जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

28 July 2023

आ.अशोकराव चव्हाण यांनी केली भोकर तालुक्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी

 भोकर :- तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिक अडचणीत आले होते.याची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री तथा भोकरचे आमदार मा.अशोकराव चव्हाण यांनी शुक्रवारी भोकर तालुक्यातील नांदा (म्है.प.),रावणगांव, लगळूद आदी गावास भेट देवून पूरग्रस्त गावाची व बाधित शेतीची पाहणी करून  संबधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या.  
  गेल्या तीन दिवसापासून भोकर तालुक्यात अतिवृष्टी होवून पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने अनेक गावात नदीचे पाणी शिरल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.लगळुद,रावणगाव व नांदा म्है.प. येथील शेकडो घरे पुराच्या पाण्याने वेढल्याने नागरिक उघड्यावर पडले होते.या सर्व पूरग्रस्त नागरिकांसी आस्थेवाईक पणे संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने त्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या.ज्यांच्या घरात पाणी शिरले अशांना प्रत्येकी दहा हजार व अन्नधान्य देण्यात येईल तशेच पडझड झालेल्या घरांचे व शेतीचे तात्काळ पंचनामे करून पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही तात्काळ आर्थिक मदत करण्याच्या सूचनाही संबधितांना दिल्या.      यावेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे,माजी जि.प.अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर, तालुकाध्यक्ष भगवान दंडवे,माजी कृषी सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर, सभापती जगदीश पाटील,उपविभागीय अधिकारी अनुपसिंग यादव, तहसिलदार राजेश लांडगे, नामदेव आयलवाड , मारोती शंखतीर्थकर,अत्रिक पाटील मुंगल,बालाजी शानमवाड, खाजु इनामदार, रामचंद्र मुसळे,  गणेश राठोड,माधव अमृतवाड,संदीप पाटील गौड ,राजकुमार अंगरवार, श्याम पाटील लगळूदकर, गंपू पाटील, डॉ.मनोज गिमेकर, सय्यद खालेद, राजु पाटील दिवशीकर, विक्रम क्षिरसागर ,सुलोचना ढोले,अनिता साबळे, विठल माचनवार,तआदिनाथ चिंताकुटे, बालाजी येलपे, फारख करखेलीकर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

27 July 2023

नांदेडच्या चार चाकी वाहनाचा हैद्राबाद मार्गावर अपघात; एक ठार, एक गंभीर

 नांदेड-हज यात्रेवरून हैद्राबाद येथून परत येणाऱ्या भाविकांना आणण्यासाठी आज सकाळी हैद्राबादकडे निघालेल्या इनोव्हा गाडीला अपघात झाला असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि चालक गंभीर आहे.आज सकाळी 5 वाजता मोहम्मद आरबाज (20) गाडी क्रमांक एम.एच.26 बी.डी.6699 घेवून देगलूर रस्त्याने हैद्राबादकडे जात होते. त्यांच्यासोबत मोहम्मद मुफती मोहम्मद आलम (25) हे होते. सकाळी 8 वाजेच्यासुमारास हैद्रबाद रस्त्यावरील पैदा कोडापगल (तेलंगणा) येथे ही गाडी दुभाजकाला भिडली. त्यामुळे ती गाडी आपल्या छतावरून आपटून पुन्हा उभी राहिली. या गाडीमधील मोहम्मद मुफती मोहम्मद आलम (25) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी चालक मोहम्मद आरबाज यांच्यावर तेलंगणा राज्यातील बान्सवाडा येथे उपचार करण्यात आले. आता त्यानंतर त्यांना नंादेडला आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.

26 July 2023

लातूर येथे मणिपूर हिंसाचार विरोधी सर्व पक्षीय धरणे आंदोलनात मनसे महिला उपाध्यक्ष सौ. रेखाताई नागराळे यांचा सहभाग

'बेटी बचाओ बेटी पढाओ' चा नारा देणाऱ्या सरकारसाठी 'मणिपूरची' घटना लज्जास्पद............
लातूर :मणिपूर हिंसाचार विरोधी सर्व पक्षीय धरणे आंदोलन गांधी चौक लातूर येथे २६ जुलै २०२३रोजी पर पडले.देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून एक आदिवासी महिला विराजमान आहेत.त्याचा एक महिला म्हणून सर्व महिलांना सार्थ अभिमान आणि गर्वच आहे,मात्र त्याच देशातील 'मनिपुर' सारख्या राज्यात आदिवासी महिलांची नग्न धिंड काढण्याचा प्रकार हा अत्यंत अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारा असून ही बाब त्या राज्यातील आणि केंद्रातील 'बेटी बचाओ बेटी पढाओ' च्या वल्गना करणाऱ्या सरकारसाठी देखील लांच्छनास्पद आहे.एवढी लज्जास्पद घटना घडूनही एकही संघटना रस्त्यावर उतरत नाही, अशा अन्यायकारक विचाराची राखरांगोळी होणार नाही तोपर्यंत आपणाला फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार म्हणून घेण्याचा खरंच अधिकार नाही,खरे पाहता या घटनेनंतर जात,पात,धर्म या बाबी बाजूला ठेवून फुले,शाहू, आंबेडकरवादी विचारधारा मानणाऱ्यांनी,महिला व युवकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.त्याची सुरुवात आज लातूर मधून झाली लातूरमध्ये गांधी चौकात मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात सर्वपक्षीय,विविध संघटना, विविध विचारधारेच्या महिला व पुरुष मंडळी एकत्र येत आज आवाज उठवला त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची राज्य उपाध्यक्ष (मनसेची प्रतिनिधी) म्हणून राज्य उपाध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तथा मा. उपसभापती पं.स.औसा.सौ. रेखा नागराळे यांनी सहभाग नोंदवला.आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व माता भगिनी,विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी यांचे आभार देखील मानले.
  

अर्धापूर केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जि. प. हायस्कूल येथे उत्साहात संपन्न

( प्रतिनिधी : अंबादास बोयावार) 
अर्धापूर:जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा अर्धापूर केंद्राचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी दिनांक 26 रोजी उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी गोडबोले साहेब हे होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख विकास चव्हाण साहेब यांनी केले. प्रास्ताविक पर भाषणात त्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करताना सेतू अभ्यासक्रम, विद्या प्रवेश आढावा, पाठ्यपुस्तकाबाबत उद्बोधन, शाळेत घ्यावयाचे शैक्षणिक उपक्रम, त्याबाबत ठेवावयाच्या दैनंदिन शैक्षणिक नोंदी आदी विषयावर उपस्थित सर्व शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी गोडबोले साहेब यांनी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत सकाळी 11 ते 12 यादरम्यान व्हीस्कूल वर मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान ( FLN ) स्तर निश्चिती कार्यशाळा ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. ऑनलाइन प्रशिक्षण सुरळीतपणे चालण्यासाठी कारवाडी येथील तंत्रस्नेही शिक्षक संतोष राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रशिक्षणाचा लाभ उपस्थित सर्व शिक्षकांनी घेतला. या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी माहिती समजावून घेतली.
   याच कार्यक्रमांमध्ये पांगरी येथील तंत्रस्नेही शिक्षक सतीश वाकोडे यांनी व्ही स्कूलचा वापर शिक्षकांनी कशा पद्धतीने केला पाहिजे तसेच या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यास हा ॲप नक्कीच प्रेरणादायी आहे असे मार्गदर्शन केले. त्यानंतर देळुब येथील तंत्रस्नेही शिक्षक माणिक मस्के यांनी अध्ययन स्तर निश्चिती व पी.पी.टी .या विषयावर उपस्थित सर्व शिक्षकांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. या शिक्षण परिषदेस जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक एम .डब्ल्यू. शेख साहेब,केंद्रीय मुख्याध्यापिका ज्ञानेश्वरी फड, सुलभक उषा नळगिरे, अशोक गायकवाड,केंद्रातील सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,प्राथमिक शिक्षक, अंतर्गत शाळेचे सर्व मुख्याध्यापक यांच्यासह केंद्रातील अनेक शिक्षक या शिक्षण परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  

25 July 2023

खरबी येथील दोन शेतकरी ठरले 'सलोखा योजनेचे' राज्यातील पहिले लाभार्थी

खरबी येथील दोन शेतकरी ठरले 'सलोखा योजनेचे' राज्यातील पहिले लाभार्थी

भोकर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी 'सलोखा योजनेचा' लाभ घ्यावा - तहसिलदार राजेश लांडगे

भोकर तालुका प्रतिनिधि अंबादास बोयावार 
भोकर : एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किंवा वेगवेगळ्या दोन ठिकाणी किमान १२ वर्ष ते अधिक काळापासून ताबा असणाऱ्या शेतजमीनधारकांनी एकमेकांच्या सामंजस्याने ती जमीन अदलाबदल करुन घेण्यास्तवच्या दस्तांसाठी मुद्रांक शुल्क १ हजार रुपये व नोंदणी शुल्क १ हजार रुपये असे केवळ २ हजार रुपये आकारुन ती जमीन त्या दोन शेतकऱ्यांच्या नावे दस्त नोंदणी करुन देण्यात येणारी 'सलोखा योजना' राज्य शासनाने दि.३ जानेवारी २०२३ पासून सुरु केली असून या योजनेचा लाभ घेणारे खरबी ता.भोकर येथील दोन शेतकरी राज्यातील पहिले लाभार्थीं ठरले आहेत.तर सदरील योजना शेतकऱ्यांच्या शेती मुल्यांकनाच्या लाखों रुपयांच्या महसूल शुल्क खर्चाची बचत करणारी असून आपापसातले वाद संपुष्टात आणून सामंजस्य व सलोखा वाढविणारी असल्याने भोकर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी 'सलोखा योजनेचा' लाभ घ्यावा,असे आवाहन तहसिलदार राजेश लांडगे यांनी केले आहे.

राज्यात जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद,शेत बांधावरून होणारे वाद,जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद,शेत जमीन मोजणीवरून होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरून होणारे वाद,शेती वहीवाटीचे वाद,भावा-भावांतील वाटणीचे वाद, शासकीय योजेनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यते बाबतचे वाद,दोन शेतकऱ्यांची वेगवेगळ्या गटांत असलेली शेती एकत्र व एकाच ठिकाणी करण्याचा वाद, अशा प्रकारे इत्यादी वाद आहेत.शेतजमिनीचे हे वाद अत्यंत क्लिष्ट स्वरुपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालय आणि प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी हे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर वाद संपुष्टात येण्यासाठी शेतकऱ्यांनी एकमेकांच्या सामंजस्याने केवळ २ हजार रुपये शुल्क खर्च करुन ती जमीन अदलाबदल करुन एकमेकांच्या नावावर दस्त नोंदणीने हस्तांतरीत करण्यासाठी दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'सलोखा योजनेस' राज्य शासनाने मान्यता दिली.तसेच दि.३ जानेवारी २०२३ रोजी या योजनेच्या अंमलबजावणीचा अध्यादेश काढण्यात आला आहे.

शेतकरी शिवाजी विठ्ठलराव कल्याणकर आणि किशन बळवंतराव कल्याणकर दोघेही रा.खरबी ता.भोकर यांची खरबी शिवारातील गट क्रं.८१ व ८२ मध्ये साधारणतः प्रत्येकी ९० आर जमिन दोन ठिकाणी विभागलेली आहे. त्यामुळे मशागत करतांना व पेरणी करतांना दोघांत काहीवेळा वाद व्हायचा.हा वाद कायमचा मिटावा म्हणून दोन गटात असलेली ती जमिन अदलाबदल करुन एकत्र करता यावी यासाठी या दोघांनी तहसिल कार्यालय व दुय्यम निबंधक-श्रेणी १,कार्यालय भोकर येथे जवळपास गेल्या ५ वर्षांपासून प्रयत्न केला.एकमेकांची ती जमीन अदलाबदल करण्यासाठी त्यांना शेत जमिन मुल्यांकनानुसार प्रत्येकी २ लाख रुपये असे ४ लाख रुपये खर्च येणार होता.दरम्यानच्या काळात विद्यमान राज्य शासनाने 'सलोखा योजना' सुरु केल्याची बातमी त्यांनी एका वृत्तपत्रातून वाचली व भोकर तहसिलचे तहसिलदार राजेश लांडगे,मंडळ अधिकारी शेख मुसा सरवर व तलाठी संदीप केंद्रे यांच्याशी संपर्क साधला. यावरुन तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपरोक्त उल्लेखीत गटातील जमिनीच्या चतुर्सिमेतील शेतकऱ्यांचे जबाब घेतले आणि योग्यरित्या पंचनामा करुन अहवाल तयार केला.सदरील 'सलोखा योजनेचा' लाभ मिळावा यासाठी त्या अहवालाची संचिका दुय्यम निबंधक श्रेणी-१,कार्यालय भोकर येथे शेतकरी शिवाजी कल्याणकर व किशन कल्याणकर यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये सादर केली. यावेळी दुय्यम उपनिबंधक एस.डी.कौशल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली दस्तलेखक दत्तात्रय पांचाळ यांनी ती जमीन त्या दोन शेतकऱ्यांच्या नावावर हस्तांतरीत करण्यासाठी दस्त नोंदणीची प्रस्ताव संचिका सादर केली.त्यानुसार मुद्रांक शुल्क १ हजार रुपये व नोंदणी शुल्क १ हजार रुपये असे केवळ २ हजार रुपये शुल्क आकारुन प्रत्येकी ९० आर जमिन दि.१५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुय्यम निबंधक यांनी खरबी येथील त्या दोन शेतकऱ्यांच्या नावावर दस्त नोंदणीने हस्तांतरीत केली. सदरील योजनेमुळे या दोन शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न ही सुटला व जवळपास ४ लाख रुपये मुल्यांकन शुल्क खर्च ही वाचला असून सदरील योजनेचा लाभ घेणारे ते राज्यातील पहिले लाभार्थीं ठरले आहेत.यामुळे उपरोक्त लाभार्थी शेतकऱ्यांनी 'सलोखा योजना' आमलात आणणाऱ्या विद्यमान सरकारचे आभार मानले आहेत.

सलोखा योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - तहसिलदार राजेश लांडगे

शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसांतील वाद मिटविण्यासाठी राज्य शासनाने 'सलोखा योजना' आणली आहे.एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे क्षेत्र एकमेकांच्या सामंजस्याने अदलाबदल करण्यासाठी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. साधारणत: १२ वर्ष व त्यापेक्षा अधिक काळ ताब्यात असलेल्या त्या जमिनीच्या नोंदविण्यात येणाऱ्या दस्तांसाठी मुद्रांक शुल्क १ हजार रुपये आणि नोंदणी शुल्क १ हजार रुपये असे केवळ २ हजार रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत.या योजनेचा खरबी ता.भोकर येथील उपरोक्त दोन शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून ते राज्यातील पहिले लाभार्थीं ठरले आहेत.सदरील योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक असून शेतकऱ्यांच्या शेत जमीन मुल्यांकनाच्या लाखो रुपयांच्या महसूल शुल्क खर्चाची बचत करणारी आहे.तसेच 'सलोखा योजना' ही आपापसातले वाद संपुष्टात आणून सामंजस्य व सलोखा वाढविणारी असल्याने भोकर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसिलदार राजेश लांडगे यांनी केले आहे.

गायराण, जंगल जमिन कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व किसान सभेचे भोकर तहसिल कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण.....

""आश्वासन नको तर जमिनीची मालकी द्या" कॉ अर्जुन आडे 

भोकर (प्रतिनिधी ) अखिल भारतीय किसान किसान सभेच्या वतिने शेतकरी, शेतमजूर व भूमिहीन शेतमजुरांना स्वतःच्या पिढधान पिढ्या कसत असलेल्या वनजमीन, जमीन, गायरान जमीन महसूल जमीनीची मालकी मिळावी यासाठी बेमुदत साखळी उपोषण दि.२४ जुले २०२३ रोजी भोकर तहसिल कार्यलयासमोर सुरु करण्यात आले
गायराण, जंगल जमिन कसणाऱ्या कास्तकरी शेतकरी मौजे डोरली (साळवाडी),जांभळी,समंदरवाडी, गोरगोटवाडी, धारजणी, कोळगाव,इळेगाव, जामदरी,आदिगावां सह भोकर तालुक्यातील अनेक गावात गायराण,जंगल जमिन पिड्यान पिड्या पासुन अतिक्रमण करूण कास्त करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आजही करीत आहे. या विषयी वेळो वेळी महसुल विभागाने राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला कास्तकरी शेतकऱ्यांच्या नावे जमिनेचे पट्टे करून देणे बाबत अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांसोबत राज्यस्तरावर अनेक अंदोलनाच्या माध्यमातुन चर्चा करून शासकीय आदेश असतांना व भोकर तालुक्यातील गायराण जंगल जमीनी वरील जमिनीचे पट्टे करून देण्यात यावे अश्या प्रकारचे अनेकदा अर्ज विनंत्या करून सुध्दा भोकर येथील प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नसल्यामुळे भोकर तहसील समोर बेमुदत साखळी उपोषण आखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरूवात करण्यात आली आहे यावेळी मागण्यांचे निवेदन भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे यांना देण्यात आले आंदोलनात सदरील आंदोलन कॉ. अर्जुन आडे (किसान सभा राज्यकार्याध्यक्ष अध्यक्ष), कॉ. शिवाजी गायकवाड (किसान सभा ता. सचिव तथा जिल्हा कमिटी सदस्य), कॉ. दिलीप पोतरे (सिटु जिल्हा कमिटी सदस्य), कॉ. अनिल कराळे (सिटु जिल्हा कमिटी सदस्य) यांच्या मागदर्शनाखाली किसान सभा तालुका कमिटी भोकर कॉ. शिवाजी वारले (कि.स.भा.ता.अ.) कॉ. भिमराव जाधव, कॉ. मोहन जाधव, रावसाहेब जाधव, पांडुरंग राठोड, गणेश राठोड, साहेबराव जाधव आदि कार्यकर्ते उपस्थित होते..

14 July 2023

कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांना केले अभिवादन

भोकर प्रतिनिधी:-जलक्रांतीचे जनक तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्रद्धेय कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त भोकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धेय कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांना अभिवादन केले.
    जयंती निमित्त सकाळी ९ वाजता भोकर तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच ९:३० वाजता डॉ.शंकराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयातही जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यानंतर मोंढा मैदानातील लिलाव शेडमध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिराचे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानराव दंडवे ,बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, जि.प.चे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, माजी उपनगराध्यक्ष शेख युसुफ,उपसभापती सुरेश बिल्लेवाड, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अत्रिक पाटील मुंगल आदींनी रक्तदान करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.त्यानंतर अनेक काँग्रेसचे पदाधिकारी व युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिरात कै. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपुरी नांदेड येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाचे यशस्वी काम केले.
  या शिबिरास काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आनिता इंगोले,महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा कळसकरताई, नांदेड जि.प. माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,माजी जि.प.सभापती प्रकाशराव भोसीकर, माजी नगराध्यक्ष डाॅ. विजय कुमार दंडे,विनोद पाटील चिंचाळकर, सौ.संगीताताई चिंचाळकर,साहेबराव सोमेवाड, उपसभापती बालाजी शानमवाड,संचालक उज्वल केसराळे,गणेश राठोड,केशव पाटील पोमनाळकर,कृष्णा वागतकर,सारंग मुंदडा, राजु अंगरवार,रामचंद्र मुसळे, खाजू इनामदार, डाॅ.राम नाईक,बाबुराव पाटील आंदबोरीकर, विक्रम क्षीरसागर,मिर्झा ताहेर बेग यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी व तालुका युवक काँग्रेस कमिटीने मोलाचे योगदान दिले.

11 July 2023

संत नगरी शेगाव येथे 16 व 17 जुलै रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा

भोकर(प्रतिनिधी ) जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयाचे आयोजन रविवार दिनांक 16 व सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी श्री गणेश प्रस्थ, मंगल कार्यालय, पुरुषोत्तम हरी पाटील नगर, एम एस ई बी चौक, खामगाव रोड, शेगांव जि. बुलढाणा येथे सकाळी 9 : 00 वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, पीठ सहप्रमुख श्री देवेंद्र दलाल, पीठ व्यवस्थापक श्री सुरेश मोरे यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे. 
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान,शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, शाळेसाठी मोफत संगणक वाटप, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, नेत्रदान, रक्तदान शिबिर,मोफत रुग्णवाहिका सेवा - महाराष्ट्रात विविध महामार्गावर 42 रुग्णवाहिका 24 तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. एड्स ग्रस्त लोकांसाठी मोबाईल व्हॅन,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन,अपत्तिग्रस्त कुटुंबासाठी मदत, शेतकऱ्यांना फवारणी यंत्र वाटप, गाई, शेळी वाटप, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, ब्लड इन नीड, इत्यादी आयोजित केली जातात. 
      या कार्यक्रमासाठी पश्चिम विदर्भ पिठ अंतर्गत जिल्ह्यातील व जिल्हा सेवा समिती यवतमाळ पूर्व मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि. 16 व 17 जुलै 2023 रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचन, दर्शन व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. याच कार्यक्रमात दिनांक 17 रोजी साधक दीक्षा कार्यक्रम सुद्धा होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी साधक दिक्षेसाठी नोंदणी करावी. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोनही दिवस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या महंन्मंगल समयी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, आप्तइष्ट मित्रांसह उपस्थित राहून परमश्रद्धेय जगद्गुरुश्रींच्या प्रवचन व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे साहेब,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे साहेब,सहपिठ प्रमुख देवेंद्र दलाल साहेब, पिठ समिती सदस्य, यवतमाळ पूर्व जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे, जिल्हाध्यक्ष सचिन वानखडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सरीता ताई राऊत यांनी केले आहे.

05 July 2023

युवक काँग्रेसच्या जिल्हा सचिव पदी बालाजी पाटील साखरे यांची निवड

बिलोली :तालुक्यातील पोखर्णी येथील काँग्रेस कार्यकर्ते तथा विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष यांची  युवक काँग्रेस च्या जिल्हा सचिव पदी निवड मंगळवारी करण्यात आली आहे.आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांचे विश्वासू साखरे यांचे आतापर्यंतचे काँग्रेस पक्षातील काम व समाजातील सर्व जाती धर्माशी निगडित राहून काँग्रेस पक्ष मजबुतीकरण करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासूचनेनुसार माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, काँग्रेसच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा मिनल पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागोलीकर, रोहिदास जाधव, शिवाजीराव धर्माधिकारी, बिलोली तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पांचपिपळीकर यांच्या उपस्थितीत सदर निवडीचे पत्र देण्यात आले आहे. बालाजी पाटील साखरे यांच्या निवडीबद्दल अनेकांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

02 July 2023

मुलाला भेटायला जाताना भीषण अपघात; नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे निधन

 नांदेड:मधून एक दुर्देवी बातमी समोर आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार (Babarao Ambadrao) यांचे अपघाती निधन झाले आहे.पुणे सोलापूर महामार्गावरील माळवत चिखली या गावाजवळ शनिवारी रात्री 11 वाजता हा अपघात झाला. ज्यामध्ये बाबाराव एंबडराव यांचे दुर्देवी निधन झाले. या घटनेने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नांदेड (Nanded) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे अपघाती निधन झाले आहे.पुणे सोलापूर महामार्गावरील माळवत चिखली गावाजवळ हा भीषण अपघात (Accident) झाल्याचे सांगण्यात येत आहे. महामार्गावर उभा असलेल्या ट्रकवर एंबडवार यांची कार धडकली. या अपघातात ऍंबडवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर त्यांचा चालक करीमखान पठाण आणि रामचंद्र मोरे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर येथे शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बाबाराव एंबडवार हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी पुणे येथे जात होते. रस्त्यात त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या अपघाती निधनाने बिलोली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.कोण होते बाबाराव एंबडवार?
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव या गावचे ते रहिवाशी होते. कोल्हेबोरगाव या गावचे सरपंच ते कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल 12 वर्ष सभापती ते राहिले. बिलोली पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे दोन वेळा उपाध्यक्ष, आणि 5 वेळा आरळी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊन शिवसेनेकडून नांदेड जिल्हा परिषदेचे दोन वेळा अध्यक्ष पद बाबाराव एंबडवार यांनी भूषविले होते.