भोकर :- तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिक अडचणीत आले होते.याची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री तथा भोकरचे आमदार मा.अशोकराव चव्हाण यांनी शुक्रवारी भोकर तालुक्यातील नांदा (म्है.प.),रावणगांव, लगळूद आदी गावास भेट देवून पूरग्रस्त गावाची व बाधित शेतीची पाहणी करून संबधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या.
गेल्या तीन दिवसापासून भोकर तालुक्यात अतिवृष्टी होवून पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने अनेक गावात नदीचे पाणी शिरल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.लगळुद,रावणगाव व नांदा म्है.प. येथील शेकडो घरे पुराच्या पाण्याने वेढल्याने नागरिक उघड्यावर पडले होते.या सर्व पूरग्रस्त नागरिकांसी आस्थेवाईक पणे संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने त्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या.ज्यांच्या घरात पाणी शिरले अशांना प्रत्येकी दहा हजार व अन्नधान्य देण्यात येईल तशेच पडझड झालेल्या घरांचे व शेतीचे तात्काळ पंचनामे करून पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही तात्काळ आर्थिक मदत करण्याच्या सूचनाही संबधितांना दिल्या. यावेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे,माजी जि.प.अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर, तालुकाध्यक्ष भगवान दंडवे,माजी कृषी सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर, सभापती जगदीश पाटील,उपविभागीय अधिकारी अनुपसिंग यादव, तहसिलदार राजेश लांडगे, नामदेव आयलवाड , मारोती शंखतीर्थकर,अत्रिक पाटील मुंगल,बालाजी शानमवाड, खाजु इनामदार, रामचंद्र मुसळे, गणेश राठोड,माधव अमृतवाड,संदीप पाटील गौड ,राजकुमार अंगरवार, श्याम पाटील लगळूदकर, गंपू पाटील, डॉ.मनोज गिमेकर, सय्यद खालेद, राजु पाटील दिवशीकर, विक्रम क्षिरसागर ,सुलोचना ढोले,अनिता साबळे, विठल माचनवार,तआदिनाथ चिंताकुटे, बालाजी येलपे, फारख करखेलीकर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.







0 comments:
Post a Comment