जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

25 July 2023

गायराण, जंगल जमिन कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व किसान सभेचे भोकर तहसिल कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण.....

""आश्वासन नको तर जमिनीची मालकी द्या" कॉ अर्जुन आडे 

भोकर (प्रतिनिधी ) अखिल भारतीय किसान किसान सभेच्या वतिने शेतकरी, शेतमजूर व भूमिहीन शेतमजुरांना स्वतःच्या पिढधान पिढ्या कसत असलेल्या वनजमीन, जमीन, गायरान जमीन महसूल जमीनीची मालकी मिळावी यासाठी बेमुदत साखळी उपोषण दि.२४ जुले २०२३ रोजी भोकर तहसिल कार्यलयासमोर सुरु करण्यात आले
गायराण, जंगल जमिन कसणाऱ्या कास्तकरी शेतकरी मौजे डोरली (साळवाडी),जांभळी,समंदरवाडी, गोरगोटवाडी, धारजणी, कोळगाव,इळेगाव, जामदरी,आदिगावां सह भोकर तालुक्यातील अनेक गावात गायराण,जंगल जमिन पिड्यान पिड्या पासुन अतिक्रमण करूण कास्त करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आजही करीत आहे. या विषयी वेळो वेळी महसुल विभागाने राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला कास्तकरी शेतकऱ्यांच्या नावे जमिनेचे पट्टे करून देणे बाबत अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांसोबत राज्यस्तरावर अनेक अंदोलनाच्या माध्यमातुन चर्चा करून शासकीय आदेश असतांना व भोकर तालुक्यातील गायराण जंगल जमीनी वरील जमिनीचे पट्टे करून देण्यात यावे अश्या प्रकारचे अनेकदा अर्ज विनंत्या करून सुध्दा भोकर येथील प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नसल्यामुळे भोकर तहसील समोर बेमुदत साखळी उपोषण आखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरूवात करण्यात आली आहे यावेळी मागण्यांचे निवेदन भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे यांना देण्यात आले आंदोलनात सदरील आंदोलन कॉ. अर्जुन आडे (किसान सभा राज्यकार्याध्यक्ष अध्यक्ष), कॉ. शिवाजी गायकवाड (किसान सभा ता. सचिव तथा जिल्हा कमिटी सदस्य), कॉ. दिलीप पोतरे (सिटु जिल्हा कमिटी सदस्य), कॉ. अनिल कराळे (सिटु जिल्हा कमिटी सदस्य) यांच्या मागदर्शनाखाली किसान सभा तालुका कमिटी भोकर कॉ. शिवाजी वारले (कि.स.भा.ता.अ.) कॉ. भिमराव जाधव, कॉ. मोहन जाधव, रावसाहेब जाधव, पांडुरंग राठोड, गणेश राठोड, साहेबराव जाधव आदि कार्यकर्ते उपस्थित होते..

0 comments:

Post a Comment