जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

26 July 2023

लातूर येथे मणिपूर हिंसाचार विरोधी सर्व पक्षीय धरणे आंदोलनात मनसे महिला उपाध्यक्ष सौ. रेखाताई नागराळे यांचा सहभाग

'बेटी बचाओ बेटी पढाओ' चा नारा देणाऱ्या सरकारसाठी 'मणिपूरची' घटना लज्जास्पद............
लातूर :मणिपूर हिंसाचार विरोधी सर्व पक्षीय धरणे आंदोलन गांधी चौक लातूर येथे २६ जुलै २०२३रोजी पर पडले.देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून एक आदिवासी महिला विराजमान आहेत.त्याचा एक महिला म्हणून सर्व महिलांना सार्थ अभिमान आणि गर्वच आहे,मात्र त्याच देशातील 'मनिपुर' सारख्या राज्यात आदिवासी महिलांची नग्न धिंड काढण्याचा प्रकार हा अत्यंत अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारा असून ही बाब त्या राज्यातील आणि केंद्रातील 'बेटी बचाओ बेटी पढाओ' च्या वल्गना करणाऱ्या सरकारसाठी देखील लांच्छनास्पद आहे.एवढी लज्जास्पद घटना घडूनही एकही संघटना रस्त्यावर उतरत नाही, अशा अन्यायकारक विचाराची राखरांगोळी होणार नाही तोपर्यंत आपणाला फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार म्हणून घेण्याचा खरंच अधिकार नाही,खरे पाहता या घटनेनंतर जात,पात,धर्म या बाबी बाजूला ठेवून फुले,शाहू, आंबेडकरवादी विचारधारा मानणाऱ्यांनी,महिला व युवकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.त्याची सुरुवात आज लातूर मधून झाली लातूरमध्ये गांधी चौकात मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात सर्वपक्षीय,विविध संघटना, विविध विचारधारेच्या महिला व पुरुष मंडळी एकत्र येत आज आवाज उठवला त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची राज्य उपाध्यक्ष (मनसेची प्रतिनिधी) म्हणून राज्य उपाध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तथा मा. उपसभापती पं.स.औसा.सौ. रेखा नागराळे यांनी सहभाग नोंदवला.आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व माता भगिनी,विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी यांचे आभार देखील मानले.
  

0 comments:

Post a Comment