जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

27 July 2023

नांदेडच्या चार चाकी वाहनाचा हैद्राबाद मार्गावर अपघात; एक ठार, एक गंभीर

 नांदेड-हज यात्रेवरून हैद्राबाद येथून परत येणाऱ्या भाविकांना आणण्यासाठी आज सकाळी हैद्राबादकडे निघालेल्या इनोव्हा गाडीला अपघात झाला असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि चालक गंभीर आहे.आज सकाळी 5 वाजता मोहम्मद आरबाज (20) गाडी क्रमांक एम.एच.26 बी.डी.6699 घेवून देगलूर रस्त्याने हैद्राबादकडे जात होते. त्यांच्यासोबत मोहम्मद मुफती मोहम्मद आलम (25) हे होते. सकाळी 8 वाजेच्यासुमारास हैद्रबाद रस्त्यावरील पैदा कोडापगल (तेलंगणा) येथे ही गाडी दुभाजकाला भिडली. त्यामुळे ती गाडी आपल्या छतावरून आपटून पुन्हा उभी राहिली. या गाडीमधील मोहम्मद मुफती मोहम्मद आलम (25) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी चालक मोहम्मद आरबाज यांच्यावर तेलंगणा राज्यातील बान्सवाडा येथे उपचार करण्यात आले. आता त्यानंतर त्यांना नंादेडला आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.

0 comments:

Post a Comment