( प्रतिनिधी : अंबादास बोयावार)
अर्धापूर:जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा अर्धापूर केंद्राचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी दिनांक 26 रोजी उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी गोडबोले साहेब हे होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख विकास चव्हाण साहेब यांनी केले. प्रास्ताविक पर भाषणात त्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करताना सेतू अभ्यासक्रम, विद्या प्रवेश आढावा, पाठ्यपुस्तकाबाबत उद्बोधन, शाळेत घ्यावयाचे शैक्षणिक उपक्रम, त्याबाबत ठेवावयाच्या दैनंदिन शैक्षणिक नोंदी आदी विषयावर उपस्थित सर्व शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी गोडबोले साहेब यांनी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत सकाळी 11 ते 12 यादरम्यान व्हीस्कूल वर मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान ( FLN ) स्तर निश्चिती कार्यशाळा ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. ऑनलाइन प्रशिक्षण सुरळीतपणे चालण्यासाठी कारवाडी येथील तंत्रस्नेही शिक्षक संतोष राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रशिक्षणाचा लाभ उपस्थित सर्व शिक्षकांनी घेतला. या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी माहिती समजावून घेतली.
याच कार्यक्रमांमध्ये पांगरी येथील तंत्रस्नेही शिक्षक सतीश वाकोडे यांनी व्ही स्कूलचा वापर शिक्षकांनी कशा पद्धतीने केला पाहिजे तसेच या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यास हा ॲप नक्कीच प्रेरणादायी आहे असे मार्गदर्शन केले. त्यानंतर देळुब येथील तंत्रस्नेही शिक्षक माणिक मस्के यांनी अध्ययन स्तर निश्चिती व पी.पी.टी .या विषयावर उपस्थित सर्व शिक्षकांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. या शिक्षण परिषदेस जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक एम .डब्ल्यू. शेख साहेब,केंद्रीय मुख्याध्यापिका ज्ञानेश्वरी फड, सुलभक उषा नळगिरे, अशोक गायकवाड,केंद्रातील सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,प्राथमिक शिक्षक, अंतर्गत शाळेचे सर्व मुख्याध्यापक यांच्यासह केंद्रातील अनेक शिक्षक या शिक्षण परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.







0 comments:
Post a Comment