जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

31 October 2019

अनिल कपूरला मुख्यमंत्री करा; नेटकऱ्यांच्या मागणीवर ‘नायक’ म्हणतो…


30 October 2019

परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी- आ.रावसाहेब अंतापुरकर

(देगलूर) - विधानसभा देगलूर,बिलोली  ह्य दोन्ही तालुक्यातील क्षेत्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे ,शेतीचे ,उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नदी-नाल्यांना व ओढ्यांना पाणी येऊन नदी नाल्या काठच्या लोकांची शेती पूर्णपणे खरडून वाहून गेली आहे त्याच बरोबर कापणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे .सतत पावसाच्या पाण्याने सोयाबीन, कापूस  या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिके उभी असतानाच त्या पिकांच्या दाण्यांना मुळे फुटले आहेत
त्यामुळे देगलूर व बिलोली दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे तरी प्रशासनाने तत्काळ संबंधित शेतीचे पंचनामे करून सरसकट आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्या संदर्भात पिक विमा कंपनीला आदेशित करावे व शासनालाही झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठवून देऊन शासनस्तरावरून नही किमान हेक्टरी 50 हजार  रूपये मदत करण्याच्या अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या कडून होत आहे. दि 30 /10/2019 रोजी देगलूर येथे  तहसीलदार  यांना देण्यात आला आहे
 त्यावेळी मा आ आमदार  रावसाहेब अंतापुरकर साहेब शिवाजीराव देशई विष्णुकांत पाटील,(माजी नगराध्यक्ष) संतोष कुलकर्णी ,जगदीश चिंतलवार, जनार्धन बिरादार ,वसीम शहापूरकार, बालाजी पाटील,  हमीद ,सयबाझ .कपिल देशमुख,,जगदीश रेड्डी ,माधव केरुरे,आदी ची उपस्थिती होती

उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंसारखा कणखरपणा दाखवावा - अशोक चव्हाण


नांदेड । राज्यात निवडणूक निकालानंतर शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. त्यामुळे शिवसेनेला हवी ती मंत्रिपदं मिळवून घेता येतील, पण शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. यावर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया आली असून स्वाभिमान गहाण न टाकता उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसारखा कणखरपणा दाखवावा असं आव्हान त्यांना उध्दव ठाकरे यांना दिलं आहे. याचवेळी शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. जी भूमिका पवार साहेबांनी घेतली आहे तीच काँग्रेसची भूमिका असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घेऊन सरकार स्थापन करेल अशी देखील चर्चा काही दिवस सुरू होती. मात्र राष्ट्रवादीने याआधीच शिवसेनेला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसने देखील आपली भूमिका स्पष्ट करत या शक्यतेवर पूर्णविराम लावला आहे.

29 October 2019

ठरलं. टीम इंडिया 'या' दिवशी खेळणार पहिली दिवस-रात्र कसोटी

October,29/2019
भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणारा दुसरा कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा कसोटी सामना भारत आणि बांगलादेश या दोनही संघांचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेश क्रिकेट मंडळासमोर (बीसीबी) याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. बांगलादेश क्रिकेट मंडळाने याबाबत होकार दर्शवला असून भारतात पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामन्याचा आनंद चाहत्यांना लुटता येणार आहे.बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.२२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान हा दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. "दिवस-रात्र कसोटी ही खूपच चांगली संकल्पना आहे. कसोटी क्रिकेटला पाठिंबा देणे आणि प्रेरणा मिळणे आवश्यक आहे. मी आणि माझे सहकारी यासाठी कटिबद्ध आहोत. याशिवाय दिवस-रात्र कसोटी खेळण्याची तयारी दर्शवल्याबद्दल विराट आणि सर्व क्रिकेटपटूंचेही आभार", असे गांगुलीने सांगितले.
''बीसीसीआयने आम्हाला दिवस-रात्र कसोटी सामन्याविषयी विचारणा केली आहे. आम्ही यावर विचारविनिमय करत आहोत. दोन-तीन दिवसांपूर्वी या विषयीचे पत्र आम्हाला मिळाले आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल,'' असे बीसीबीचे क्रिकेट संचालक अध्यक्ष अक्रम खान यांनी सांगितले होते. बीसीबीचे अध्यक्ष निझामुद्दीन चौधरी यांनी सांगितले होते की, ''खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतरच याविषयी निर्णय घेण्यात येईल. हा पूर्णपणे तांत्रिक मुद्दा असला तरी या सामन्यासाठी आमची तयारी कितपत झाली आहे, याचा विचार करूनच निर्णय कळवण्यात येईल.'' त्यानुसार बीसीबीने दिवस-रात्र कसोटीसाठी तयारी दर्शवली.दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने भारताचा कर्णधार विराट कोहली दिवस-रात्र कसोटीसाठी तयार असल्याचे आधीच सांगितले होते. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून इंदूर येथे तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्सवर होणार आहे.

'भूताच्या घरा' त 10 तास रहा आणि कमवा 14 लाख रुपये !

मंगळवार/29/2019
सध्या अॅडव्हेंचर चँलेजचा ट्रेंड आहे. काहीतरी जगावेगळे करण्याची चढाओढ प्रत्येकामध्ये लागली आहे. अशा लोकांसाठी 'हॉन्टेड हाऊस' चे आव्हान तयार करण्यात आले आहे. हे घर तयार करणाऱ्या मालकाने या घरात 10 तास घालवल्यास 14 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. जाणून घेऊया अशा या भूताच्या झपाटलेल्या घराची माहिती.
हॉन्टेड हाऊस' म्हणजेच झपाटलेल्या किंवा भुताटकीच्या घराबाबत आपल्याला गोष्टींमधून किंवा चित्रपटातून माहिती मिळालेली असते.मात्र, प्रत्यक्षात अशा घरात राहण्याच्या प्रसंग आला तर…मात्र, काही धाडसी व्यक्तींसाठी 'टेनिस' या शहरातील समरटाऊनमध्ये एक 'हॉन्टेड हाऊस' उभारण्यात आले आहे. या घरात 10 तास घालवण्याचे आव्हान पार केल्यास तब्बल 14 लाख रुपये मिळणार आहेत. मात्र, या घरात पोहचून हे आव्हान पेलणे जिकीरीचे आहे. मैक मी मेनर असे या भूताच्या घराचे नाव आहे. या घरात जाण्यासाठी 40 पानांचे करार करावा लागतो. तसेच या आव्हानासाठी काही नियमही आहेत. या घरात जाणाऱ्याचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असायला हवे. तसेच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्रही देणे गरजेचे आहे. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खऱ्या आव्हानाची सुरुवात होते.
घरात प्रवेश केल्यानंतर तेथील वातावरण बघूनच अनेकांची पाचवर धारण बसते. चित्रविचित्र आवाज येत असतात. मात्र, ते कोठून येतात, तेच समजत नाही. आवाजाचा माग काढायला गेल्यास आपण मार्गावरून भरकटतो आणि नेमके कशासाठी आलो होतो ते विसरून वेगळ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे चिडचीड वाढते आणि राग येतो. मात्र, त्यावेळी रागावर नियंत्रणे गरजेचे असते. अशा वेळीच भयावह वेषभूषा केलेले या भूताची घरातील पात्रे अचानक प्रकट होतात आणि मग घाबरगुंडी उडायला सुरुवात होते. त्यामुळे अनेकजण या टप्पातच घराबाहेर पडणे पसंत करतात. मात्र, एखादी व्यक्ती या टप्प्यातून पार झाल्यास पुढे आव्हाने आणखी खडतर होत जातात. या भूताच्या घरात प्रवेश घेणाऱ्यांना आधी सर्व गोष्टींची माहिती दिली जाते. जेणेकरून त्याची मानसिक तयारी झालेली असेल.या आव्हानात कोणतीही शारीरिक हानी होत नाही. मात्र, घरातील वातावरणामुळे येणारे दडपण सहन करणे कठीण असते. या घरात 10 तास राहणाऱ्या धाडसी व्यक्तीच्या शोधात असल्याचे या घराच्या मालकाने सांगितले. काहीजणांनी या घरातील काही टप्पे पार केले आहेत .मात्र, 10 तासांचे आव्हान अजून कोणीही पूर्ण केले नाही, असे घरमालकाने सांगितले.

पाण्यात बुडाल्याने पितापुत्राचा मृत्यू

October:29,2019 /LIVE NEWS
 नांदेड: बिलोली तालुक्यातील अरळी या गावातील शेतकरी पिता पुत्राचा नाल्यात बुडून मृत्यू झालाय. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीन ची गंजी पावसापासून सुरक्षित करण्यासाठी बापलेक शेताकडे निघाले होते, मात्र वाटेत असलेल्या ओढ्याच्या पाण्याचा अंदाज आला नाही, आणि त्यातच या दोघांचा बुडून अंत झाला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे शेतात शेतात जमा करुण ठेवलेल्या सोयाबीनची काळजी शेतक-याला लागली होती. म्हणुन 40 वर्षीय शादुल महबुब सयद आपल्या 17 वर्षाच्या मेहराज शादुल या मुलाला घेऊन शेताकडे निघाले होते. मात्र वाटेत असलेल्या एका नाल्यातून जात असताना नाल्यातील पाण्याचा अंदाज लागला नाही. त्यात मुलगा वाहुन जाताना पाहुण वडीलानी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नाल्याच्या पाण्याचा प्रवाह जास्त गतीने होता त्यामुळे त्यात हे दोघेही बापलेक वाहून जात होते.

हे पितापुत्र नाल्यात वाहून जात असल्याची खबर आरळी गावात पोहोचली. त्या नंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ या दोघांना वाचवण्यासाठी नाल्यात उतरले. मात्र तोवर या दोन्ही शेतकरी बापलेकाचा मृत्यू झाला होता. या घटनेने गावावर शोककळा पसरलीय.

28 October 2019

अशोक चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी

 नांदेड: (प्रतिनिधी)  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी आज प्रचंड गर्दी केली होती. चव्हाण आपल्या समर्थकांना भेटण्यासाठी कुसुम सभागृहात थांबले होते, तिथे सर्वांना भेटण्याची सोय करण्यात आली होती. मात्र प्रचंड गर्दी झाल्याने चव्हाण यांना सभागृहाबाहेर येऊन समर्थकांना भेटावं लागल. दरम्यान, हजारो समर्थक मोठ्या खंडानंतर आज प्रथमच नांदेडला आल्याचे दिसल्याने काँग्रेससाठी हा सुखद धक्का ठरलाय. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर चव्हाण काहीसे बॅकफूटवर गेले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत साहेब आमचा राग विठ्ठलावर नाही तर बडव्यावर असल्याचे समर्थकांनी उघडपणे बोलून दाखवले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी सर्वानाच विश्वासात घेतले होते. त्यामुळेच चव्हाण विधानसभेच्या निवडणूकीत भरघोस मतांनी विजयी झाले. आज अशोक रावांचा वाढदिवस आणि नुकताच लागलेला निवडणुकीचा निकाल यामुळे  समर्थकांचा उत्साह द्विगुणित झालेला दिसलाय.    आज चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नांदेडसह परभणी हिंगोली आणि लातुर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समर्थक आले होते. त्याशिवाय राज्याच्या अन्य भागातूनही समर्थकांनी नांदेड गाठून चव्हाण यांना भेटून शुभेच्छा दिल्या. आपल्या समर्थकांना भेटण्यासाठी कुसुम सभागृहात अशोक चव्हाण थांबले होते. मात्र दुपार नंतर गर्दी इतकी वाढली की हे सभागृह आणि सभागृहाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय.

राज्यात नुकत्याच लागलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत युतीला काठावरच बहुमत मिळालंय त्यामुळे आगामी काळात काँग्रेस सत्तेत येऊ शकते आणि काँग्रेसला सत्तेत आणायच काम केवळ अशोक चव्हाणच करू शकतात ही कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यातूनच समर्थक आपल्या साहेबांना बळ देण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. खर तर काँग्रेससाठी ही एक चांगली सुरुवात आहे, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुका मध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली तर चव्हाण यांना आगामी काळात मोठे उज्ज्वल भविष्य आहे असा दावा त्यांचे समर्थक करतायत.

26 October 2019

आश्विन माधव रानवळकर याला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



                        शुभेच्छुक
             माधव ईद्रंजीत रानवळकर (वडील)
             पंचकुला माधव रानवळकर(आई)
             ईद्रंजीत निवृत्ती रानवळकर (आजोबा)
             प्रतिभा ईद्रंजीत रानवळकर (आजी)
             सोपान गायकवाड परीवार
            सुदाम गायकवाड परिवार
            पंढरी डोईवाड परीवार
            रुक्मिणबाई निवृत्ती रानवळकर
            किसन गोविंद रानवळकर
           सोपान गोविंद रानवळकर
           गोविंद निवृत्ती रानवळकर
          बालाजी निवृत्ती रानवळकर
          पंढरी शंकर रानवळकर
         मिराताई ईद्रंजीत रानवळकर(आत्या)
         बालराज ईद्रंजीत रानवळकर(काका)
         केशव ईद्रंजीत रानवळकर (काका)
       कु.ओमकार,निवृत्ती, दिव्या,निखिल व समस्त               रानवळकर परीवार

25 October 2019

देगलूर - बिलोली ९० विधानसभा मत मोजणीचा निकाल जाहीर . . .

देगलूर - बिलोली ९० विधानसभा मत मोजणीचा निकाल जाहीर . . .
1 ) काँग्रेस - रावसाहेब अंतापूरकर - ८९४०७
2 ) शिवसेना - सुभाष साबणे - ६६९७४
3 ) बसपा सावित्रीबाई कांबळे - १३६५ _ _ _
०४ ) वंचीत - रामचंद्र भरांडे - १२०५७
०५ ) विमल बाबुराव वाघमारे - ६५९
०६ ) बळवंत राजाराम गजभारे - ८४६
०७ ) बालाजी बळीराम बंडे - ३५२३ _ _ _
०८ ) भिमराव ना . गायकवाड - ६२३
०९ ) रामचंद्र वनंजे - १००१
१० ) नोटा - १६७६
अंतापूरकर हे संपूर्ण मतमोजनी नंतर शिवसेनेचे उमेदवार आमदार सुभाष साबणे यांचा २२४३३ मतांनी पराभव केला आहे . . . . /