जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

28 October 2019

अशोक चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांची मोठी गर्दी

 नांदेड: (प्रतिनिधी)  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी आज प्रचंड गर्दी केली होती. चव्हाण आपल्या समर्थकांना भेटण्यासाठी कुसुम सभागृहात थांबले होते, तिथे सर्वांना भेटण्याची सोय करण्यात आली होती. मात्र प्रचंड गर्दी झाल्याने चव्हाण यांना सभागृहाबाहेर येऊन समर्थकांना भेटावं लागल. दरम्यान, हजारो समर्थक मोठ्या खंडानंतर आज प्रथमच नांदेडला आल्याचे दिसल्याने काँग्रेससाठी हा सुखद धक्का ठरलाय. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर चव्हाण काहीसे बॅकफूटवर गेले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत साहेब आमचा राग विठ्ठलावर नाही तर बडव्यावर असल्याचे समर्थकांनी उघडपणे बोलून दाखवले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी सर्वानाच विश्वासात घेतले होते. त्यामुळेच चव्हाण विधानसभेच्या निवडणूकीत भरघोस मतांनी विजयी झाले. आज अशोक रावांचा वाढदिवस आणि नुकताच लागलेला निवडणुकीचा निकाल यामुळे  समर्थकांचा उत्साह द्विगुणित झालेला दिसलाय.    आज चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नांदेडसह परभणी हिंगोली आणि लातुर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समर्थक आले होते. त्याशिवाय राज्याच्या अन्य भागातूनही समर्थकांनी नांदेड गाठून चव्हाण यांना भेटून शुभेच्छा दिल्या. आपल्या समर्थकांना भेटण्यासाठी कुसुम सभागृहात अशोक चव्हाण थांबले होते. मात्र दुपार नंतर गर्दी इतकी वाढली की हे सभागृह आणि सभागृहाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय.

राज्यात नुकत्याच लागलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत युतीला काठावरच बहुमत मिळालंय त्यामुळे आगामी काळात काँग्रेस सत्तेत येऊ शकते आणि काँग्रेसला सत्तेत आणायच काम केवळ अशोक चव्हाणच करू शकतात ही कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यातूनच समर्थक आपल्या साहेबांना बळ देण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. खर तर काँग्रेससाठी ही एक चांगली सुरुवात आहे, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुका मध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली तर चव्हाण यांना आगामी काळात मोठे उज्ज्वल भविष्य आहे असा दावा त्यांचे समर्थक करतायत.

0 comments:

Post a Comment