October:29,2019 /LIVE NEWS
नांदेड: बिलोली तालुक्यातील अरळी या गावातील शेतकरी पिता पुत्राचा नाल्यात बुडून मृत्यू झालाय. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीन ची गंजी पावसापासून सुरक्षित करण्यासाठी बापलेक शेताकडे निघाले होते, मात्र वाटेत असलेल्या ओढ्याच्या पाण्याचा अंदाज आला नाही, आणि त्यातच या दोघांचा बुडून अंत झाला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे शेतात शेतात जमा करुण ठेवलेल्या सोयाबीनची काळजी शेतक-याला लागली होती. म्हणुन 40 वर्षीय शादुल महबुब सयद आपल्या 17 वर्षाच्या मेहराज शादुल या मुलाला घेऊन शेताकडे निघाले होते. मात्र वाटेत असलेल्या एका नाल्यातून जात असताना नाल्यातील पाण्याचा अंदाज लागला नाही. त्यात मुलगा वाहुन जाताना पाहुण वडीलानी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नाल्याच्या पाण्याचा प्रवाह जास्त गतीने होता त्यामुळे त्यात हे दोघेही बापलेक वाहून जात होते.
हे पितापुत्र नाल्यात वाहून जात असल्याची खबर आरळी गावात पोहोचली. त्या नंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ या दोघांना वाचवण्यासाठी नाल्यात उतरले. मात्र तोवर या दोन्ही शेतकरी बापलेकाचा मृत्यू झाला होता. या घटनेने गावावर शोककळा पसरलीय.








0 comments:
Post a Comment