(देगलूर) - विधानसभा देगलूर,बिलोली ह्य दोन्ही तालुक्यातील क्षेत्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे ,शेतीचे ,उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नदी-नाल्यांना व ओढ्यांना पाणी येऊन नदी नाल्या काठच्या लोकांची शेती पूर्णपणे खरडून वाहून गेली आहे त्याच बरोबर कापणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे .सतत पावसाच्या पाण्याने सोयाबीन, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिके उभी असतानाच त्या पिकांच्या दाण्यांना मुळे फुटले आहेत
त्यामुळे देगलूर व बिलोली दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने तत्काळ संबंधित शेतीचे पंचनामे करून सरसकट आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्या संदर्भात पिक विमा कंपनीला आदेशित करावे व शासनालाही झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठवून देऊन शासनस्तरावरून नही किमान हेक्टरी 50 हजार रूपये मदत करण्याच्या अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या कडून होत आहे. दि 30 /10/2019 रोजी देगलूर येथे तहसीलदार यांना देण्यात आला आहे
त्यावेळी मा आ आमदार रावसाहेब अंतापुरकर साहेब शिवाजीराव देशई विष्णुकांत पाटील,(माजी नगराध्यक्ष) संतोष कुलकर्णी ,जगदीश चिंतलवार, जनार्धन बिरादार ,वसीम शहापूरकार, बालाजी पाटील, हमीद ,सयबाझ .कपिल देशमुख,,जगदीश रेड्डी ,माधव केरुरे,आदी ची उपस्थिती होती
30 October 2019
Home »
» परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी- आ.रावसाहेब अंतापुरकर








0 comments:
Post a Comment