भोकर प्रतिनिधी:-जलक्रांतीचे जनक तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्रद्धेय कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त भोकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धेय कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांना अभिवादन केले.
जयंती निमित्त सकाळी ९ वाजता भोकर तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच ९:३० वाजता डॉ.शंकराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयातही जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यानंतर मोंढा मैदानातील लिलाव शेडमध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिराचे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानराव दंडवे ,बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, जि.प.चे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, माजी उपनगराध्यक्ष शेख युसुफ,उपसभापती सुरेश बिल्लेवाड, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अत्रिक पाटील मुंगल आदींनी रक्तदान करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.त्यानंतर अनेक काँग्रेसचे पदाधिकारी व युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिरात कै. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपुरी नांदेड येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाचे यशस्वी काम केले.
या शिबिरास काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आनिता इंगोले,महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा कळसकरताई, नांदेड जि.प. माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,माजी जि.प.सभापती प्रकाशराव भोसीकर, माजी नगराध्यक्ष डाॅ. विजय कुमार दंडे,विनोद पाटील चिंचाळकर, सौ.संगीताताई चिंचाळकर,साहेबराव सोमेवाड, उपसभापती बालाजी शानमवाड,संचालक उज्वल केसराळे,गणेश राठोड,केशव पाटील पोमनाळकर,कृष्णा वागतकर,सारंग मुंदडा, राजु अंगरवार,रामचंद्र मुसळे, खाजू इनामदार, डाॅ.राम नाईक,बाबुराव पाटील आंदबोरीकर, विक्रम क्षीरसागर,मिर्झा ताहेर बेग यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी व तालुका युवक काँग्रेस कमिटीने मोलाचे योगदान दिले.







0 comments:
Post a Comment