नांदेड दि . 23 : - मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागतनगर , मालेगाव रोड नांदेड येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक , उच्च माध्यमिक , पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांना नुतन प्रवेशासाठी 30 ऑगस्ट 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत . यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही . अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी , असे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे . अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे गुणपत्रक , सन 2021-22 या वर्षाचे तहसिलदार कार्यालयाने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्राची सत्यप्रत साक्षांकित करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे . प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 22 ते 30 ऑगस्ट 2022 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील . या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील . विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल . या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे . विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो . मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत . प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही , असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे .
23 August 2022
Home »
» मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन







0 comments:
Post a Comment