नांदेड दि .15 : - शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदवल्यानंतर / पिक विमा भरल्यानंतर शेतात पेरलेल्या पिकांची ई - पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करावी , असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर . बी . चलवदे यांनी केले आहे . शेतकरी पिक पेरणीबाबत स्वयंघोषणापत्र देऊन विमा योजनेत सहभागी होतात परंतु प्रत्यक्ष काही शेतात पेरलेले पिक वेगळे असते . शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या पिकांचाच विमा होणे आवश्यक आहे . विमा घेतलेले पीक शेतात पेरले नसल्यास शेतकऱ्यांचा विमा अर्ज बाद केला जाऊन त्याचे भरलेला विमा हप्ता जप्त केला जातो आणि त्यास विमा नुकसान भरपाईचा कोणताही दावा मिळत नाही . शेतकऱ्यांनी पिक विमा भरल्यानंतर घेतलेल्या पिक संदर्भात त्यांनी चालू हंगामात ई - पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहित धरण्यात येणार आहे . त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वयंघोषणापत्रात नोंदविलेल्या पिकांचीच नोंद वेळेत ई - पिक पाहणीद्वारे करुन घ्यावी .
15 July 2022
Home »
» पिक विमा भरल्यानंतर ई - पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्याचे आवाहन







0 comments:
Post a Comment