नायगाव:बाचोटी येथुन लग्न आटपून घुंगराळ्यात येताच दुचाकीस भंगार घेऊन नांदेडला जाणा-या भरधाव ट्रक ने उडवल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर झाली. घटना आज दिनांक 7 जुन रोजी 6 च्या दरम्यान घुगराळा बस्थानकावर घडली आहे .
नायगांव तालुक्यातील घुंगराळा येथील बालाजी शिताराम सुगावे वय (40 ), नातेवाईकाच्या लग्नासाठी पत्नी संगीता बालाजी सुगावे (वय 35), रूतुजा बालाजी सुगावे( वय 13 ), हे तीघे ही मोटारसायकल क्र एम.एच.26 ए.ए . 684 या वर बाचोटी येथील लग्न आटोपून 6 वाजता च्या सुमारास घुंगराळा बस्थानकावर येताच नायगांव येथुन भंगार घेऊन भरधाव वेगात जाणा-या ट्रंक क्र .एम.एच .26 एच .8724 याने दुचाकीस जोराची धडक दिल्याने बालाजी शिताराम सुगावे व त्यांची 13 वर्षाच्या रूतुजा बालाजी सुगावे बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे .
दोन्ही मृतदेह कुंटुर पोलीसांनी उतरीय तपासणीसाठी नायगांव ग्रामीन रूग्णालयात नेण्यात आले आहे . या तील गंभीर जखमी संगीता सुगावे याना पुढील उपचारासाठी नांदेड येधे नेण्यात आले आहे .ट्रक चालकास कुंटुर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .हे वृत्त लिहीपर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुंटुर पोलीस ठाण्यात सुरू होती.







0 comments:
Post a Comment