नांदेड:- कोरोनाच्या संसर्गाने बुधवारी मोठा दणका दिला, असून दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 21 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक देगलूरनाका या भागात आहेत,तर त्या खालोखाल शिवाजी नगर, नई आबादी या भागातील तर एक रुग्ण देगलूर तालुक्यातील आमदापुर येथील रहिवासी आहे.
मागच्या बर्याच दिवसांनी कोरोनाच्या रुग्णांनी दुहेरी आकडा गाठला आहे. यापूर्वी लंगर साहिब परिसरात एकाच वेळी 20 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर दहा, बारा व त्यानंतर कोरोनाचा आकडा एकेरी संख्येत आला होता. मात्र बुधवार दि. 3 जून रोजी 132 स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 21 रुग्ण हे कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.99 स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आला. 6 अहवाल नाकारण्यात आले, तर 6 अहवाल अनिर्णीत आहेत.
कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये देगलूर नाका भागातील 11, शिवाजी नगर व नई आबादी भागातील-9 व एक देगलूर तालुक्यातील आमदापुर येथील आहेत. यामध्ये 13 पुरुष व 7 महिलांचा समावेश आहे. या 21 जणांमध्ये 04, 10, 10 या वयातील मुले तर 5 व 8 आठ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे.
उर्वरीत पुरुषांचे वय हे 34, 18, 22, 20, 20, 35, 18, 15, 14, 30 असे असून महिलांचे वय हे 30, 35, 32, 16 व 35 वर्षे असे आहे.
—–
दिवसभरात 23 रुग्ण
नांदेड जिल्ह्यात दिवसभराच्या काळात 23 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सकाळी इतवारा व मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील तर दुपारी 21 जणांमध्ये नांदेडचे 20 ते देगलूर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 175 पोहचली आहे. तर उपचारातून बरे झालेले रुग्ण हे 126 आहेत.







0 comments:
Post a Comment