मुंबई | बरोबर सायंकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे 29 वे तर शिवसेनेचे 3 रे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकूण सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मी जयंत कुसुम राजाराम पाटील असं म्हणत आणि शरद पवार साहेबांना वंदन करून शपथ घेतो की, असं म्हटलं. यावेेळी शिवतिर्थावर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसंच राष्ट्रवादीचे दुसरे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचं स्मरण केलं. त्याचबरोबर भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही अभिवादन केलंदुसरीकडे काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. तर विदर्भातले काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत आणि तथागत गौतम बुद्ध यांना साक्ष ठेवत मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.







0 comments:
Post a Comment