जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

09 November 2019

सरकारवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला; तो देशद्रोह होत नाही- सुप्रिम कोर्टाचे जज

अहमदाबाद |  सरकारवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. सरकावर टीका केल्याने देशद्रोही होत नाही, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक गुप्ता यांनी व्यक्त केलं आहे.

जो कोणी सरकारवर टीका करेल त्याला जर देशद्रोही ठरवलं तर मात्र देशात कठीण परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असं परखड मतंही त्यांनी नमूद केलं. ते अहमदाबादमध्ये वकिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते.आपण संस्थांवर होणारी टीका बंद करण्याचा प्रयत्न केला तर बिकट परिस्थिती निर्माण होईल. तो लोकशाहीला मोठा धोका असेल, असंही ते म्हणाले.

भारतीय संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. जर तोच अधिकार नाहीसा झाला तर लोकशाही संस्थांना धोका आहे, अशी भिती गुप्ता यांनी व्यक्त केली.प्रत्येक समाजाचे काही नियम असतात. मात्र त्या समाजातील लोक जुन्या विचारांवरच जर चालत राहिली तर त्या समाजाचा विकास खुंटतो. मतं-मतांतरानींच नवे विचारवंत घडतात. त्यामुळे मतभिन्नतेचा आदर करायला हवा, असं गुप्ता म्हणाले.

0 comments:

Post a Comment