जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

07 November 2019

जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत ओला दुष्काळ व कर्ज माफीचा ठराव

(नांदेड )जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करावा व 50 हजारांची तातडीची मदत देण्यात यावी असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला व तो राज्य शासनास तात्काळ पाठविण्यात यावा असा ठराव घेण्यात आला .जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थायी समितीची बैठक पार पडली . यावेळी उपाध्यक्ष समाधान जाधव , शिक्षण सभापती माधवराव मिसाळे , दत्तु रेड्डी , सौ . शिला दिनेश निखाते , मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे , डॉ . शरद कुलकर्णी , स्थायी सदस्य संजय बेळगे , ऍड . रामराव नाईक , बाळासाहेब रावणगावकर , प्रविण पाटील चिखलीकर , पुनम पवार , विजय धोंडगे , सुशिलाताई बेटमोगरेकर यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती .यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह सर्वच आमदारांचा अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडणयात आला . या बरोबर ओला दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करण्यात यावी . हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये देण्यात यावे असा ठराव देखील घेण्यात आला . याचबरोबर किनवट येथील कामात निष्काळजीपणा केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर निलंबनाची ही मागणी करण्यात आली . खानापुर येथील आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी नाईक यांनी प्रस्ताव सादर केला असता सोमवारपासून हे केंद्र सुरू करण्यातसुरू करण्यासाठी नाईक यांनी प्रस्ताव सादर केला असता सोमवारपासून हे केंद्र सुरू करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली . बाळासाहेब रावणगावकर आणि संजय बेळगे यांनी ममातोळ व लोहगाव येथील आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याची बाब उपस्थित केली असता या ठिकाणीही तात्काळ कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही यावेळी सभागृहात आरोग्य अधिकारी यांनी दिली .बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दलितवस्तीचा मुद्दा गाजणारअसल्याचे संकेत देण्यात आले होते . मात्र या बैठकीला समाजकल्याण अधिकारीच गैरज हजर असल्यामुळे दलित वस्तीच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही तसेच ज्या विभागाचे कर्मचारी उपस्थितीत नाहीत त्या विभागाच्या प्रतिनिधीनी सभागृहात बसू नये असा पवित्राही सदस्यांनी घेतला यामुळे कांहीवेळ सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले . एकंदरीत समाजकल्याणच्या दलितवस्तीवरून गर्मागर्मीची चर्चा होणार  असल्याचे मंगळवारीच माहिती प्राप्त झाली होती . मात्र या बैठकीला जाणीवपूर्वक समाजकल्याण अधिकारी उपस्थित नसल्याचे सदस्यांनी सभागृहात उपस्थित केले .

0 comments:

Post a Comment