जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

02 November 2019

तुमचं ठरेपर्यत मुख्यमंत्री पद माझ्याकडे द्या बीडचा तरुणाची राज्यपालांना पत्राद्वारे मागणी

बिड) जिल्हातील केज रहिवासी असलेल्या श्रीकांत विष्णू गदळे तो लिहितो की मी १०ते १२ वर्षापासून राजकारणात समाजकार्यात अग्रेसरआहे.शेतकरी,गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्ननावर काम करीत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . शेतामध्ये पेरलेले सर्व पिकांची नुकसान झाली आहे . त्यामुळे  शेतकरी , सर्वसामान्य वर्ग चिंतेत असतांना , एकीकडे भाजप व शिवसेना यांच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा निर्माण झाल्यामुळे या महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग व सर्वसामान्य वर्ग अडचणीत सापडला आहे . राज्यातील जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात यावा . म्हणून महाराष्ट्राचे मा . राज्यपाल साहेबांना विनंती करतो की , भाजप - शिवसेना मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री पदाचा पदभार देण्यात यावा , जेणेकरून मी शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवील आणि त्यांना न्याय देईल असा मी विश्वास देतो .अस  निवेदना द्वारा करण्यात आले आहे

0 comments:

Post a Comment