जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

25 November 2019

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार फडणवीस सरकारचं भवितव्य; आज होणार सुनावणी

नवी दिल्ली | राज्यातील सत्तेचा तिढा आणखीच गुंतागुंतीचा झालाय. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधीलाचं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. तर सुप्रिम कोर्टाने राज्यपालांचा आदेश आणि आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करण्याचा आदेश दिलाय. या सगळ्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.

सकाळी 10.30 वाजता ही सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय देतं यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद आता कोर्टात पोहोचलाय.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर रविवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याची बाजू मांडतांना कपिल सिब्बल यांनी फडणवीस सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

दरम्यान, जर राज्यात भाजपकडं बहुमत आहे तर त्यांनी ते आजचं सिद्ध करावं. तसेच मध्यरात्री अचानक राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्याचा मुद्दाही सिब्बल यांनी उपस्थित केला.

0 comments:

Post a Comment