टीव्ही ९ मराठीच्या वृत्तानुसार बारामतीच्या कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केले . राष्ट्रवादी काँग्रेसनं काही महिन्यांपूर्वीच भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता . याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेत्यांच्या बैठकीही झाल्या होत्या . मात्र आता हे सगळे नेते मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं अजित पवारांनी सांगितले . सभागृहात गुप्त मतदान झाल्यास आपण जिंकणारच असा विश्वास अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला . आता काही ज्येष्ठ नेते मला भेटत आहेत , मला शब्द फिरवायला सांगितला जातोय असं अजितदादा म्हणाले . मात्र मी आता काही बोलणार नाही , वेळ आल्यावर माझ्या सोयीनं सगळं बोलेन असा गर्भित इशारा अजित पवारांनी दिला आहे . तसेच केंद्रात भाजपाचे भक्कम सरकार आहे . त्यामुळे केंद्राकडून विकास कामांसाठी भरघोस निधी आपल्याला मिळेल त्यासाठी भाजपासोबत जाणं योग्य आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलं . त्यामुळे अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना अपयश हाती लागणार हे दिसून येत आहे .
25 November 2019
Home »
» आमचं अगोदरच ठरलं होत अजित पवारांचा गौप्यस्फोट ?







0 comments:
Post a Comment