जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

15 November 2019

राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल:अशोकराव चव्हाण

नांदेड : काँग्रेस - राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाआघाडी संदर्भात प्रक्रिया सुरू असून याबाबत बैठकाही चालू आहेत . आमची सकारात्मक भूमिका असून कशाप्रकारे मंत्रिमंडळ आणि जागावाटप होईल , याबाबत चर्चा चालू आहे . त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन होईल , अशी माहिती गुरुवारी ( ता . 14 ) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली . महाराष्ट्रात कोणाचे सरकार यावे ? या सरकारचे स्वरूप कसे असावे , या विषयी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबईत चर्चेच्या फेया सुरु आहेत . या सर्व चर्चामध्ये काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे ही सहभागी आहेत . तरी देखील त्यातून वेळ काढून श्री . चव्हाण हे नांदेडच्या दौयावर गुरुवारी आले . पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालकदिनाचे औचित्य साधत त्यांनी बालगोपालांशी संवाद साधला व काहीवेळ त्यांच्यात रमले . त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते . श्री . चव्हाण यांचे गुरुवारी दुपारी अडीच वाजता मुंबईहून विमानाने नांदेडला आगमन झाले . त्यानंतर त्यांनी थेट सिडको येथील इंदिरा गांधी शाळेमध्ये बालकदिनासाठी हजेरी लावली . कार्यक्रमस्थळी पोहोचतानाच त्यांचा मूड काही वेगळाच होता . काँग्रेसचे पदाधिकारी किंवा इतर राजकीय व्यक्तींना जास्तीचा वेळ न देता ते व्यासपीठावर जाण्याऐवजी बालगोपाळांमध्ये सामील झाले . अनेक लहान मुलांना गुलाबपुष्प देऊन त्यांना बालकदिनाच्या शुभेच्छा दिल्या . छोट्या - छोट्या मुलांसोबतची त्यांची छबी कॅमेयामध्ये अनेकांनी टिपली . त्यानंतर त्यांचे आगमन व्यासपीठावर झाले . सत्काराचा छोटेखानी सोहळा झाल्यानंतर हातात ध्वनीक्षेपक घेत त्यांनी बालगोपालांशी संवाद साधला . ते म्हणाले , माझ्या कन्या सुजया व श्रीजया यांची बालकदिनानिमित्त बालकांसोबत मी काहीवेळ घालावा अशी इच्छा होती व हे करण्यामध्ये मलाही नेहमी आनंद मिळतो . त्यामुळेच या राजकीय धामधूमीच्या परिस्थितीत सुद्धा मी बालगोपालांची हितगूज करण्यासाठी शाळेत पोहचलो . संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी एकही राजकीय शब्द वापरला नाही . केवळ मुलांमध्ये जाऊन आनंद घ्यावा व मुलांना आनंद द्यावा यासाठीच आपण या ठिकाणी आलो असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले .

0 comments:

Post a Comment