जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

26 November 2019

मी पुन्हा येईन, पुन्हा येईन…या या या आमच्या बोकांडी बसा”

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचारसभेत ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ हे वाक्य म्हटलं होतं. त्यांचं हे वाक्य संपुर्ण महाराष्ट्रभर गाजलं. देवेंद्र फडणवीसांच्या या वाक्यामुळं सोशल मीडियावर विरोधकांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. आता तर त्यांच्या याच वाक्यावर एक गाण आलं आहे.

‘मी पुन्हा येईन ,पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा…या या या आमच्या बोकांडी बसा’ अशी गाण्याची सुरूवात आहे. गायक साजन बेंद्रेंनी हे गाण गायलं आहे. सध्या संपुर्ण महाराष्ट्राभर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.देवेंद्र फडणवीसांची मी पुन्हा येईन ,पुन्हा येईन’ ही टॅगलाईन चांगलीच गाजली. या टॅगलाईनला कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनातील ‘या या या बसा आमच्या बोकांडी’ ही क्लीप कापून फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन ,पुन्हा येईन’ या क्लीपला एकत्रित जोडली गेली. त्यानंतर ही क्लीप महाराष्ट्रातील अनेकांच्या व्हाट्सअप स्टेटसह फेसबुक, इन्टाग्रामवर पाहायला मिळत होती.

दरम्यान, गायक साजन बेंद्रे यांंचं हे गाण प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे.

0 comments:

Post a Comment