जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

02 November 2019

बिलोली आगारातील बसचालकाचा प्रामाणिकपणा

(बिलोली)नांदेड ते सगरोळी प्रवासादरम्यान एका प्रवाशाची दागिन्यांची बॅग बसमध्येच विसरुन राहिली . आगारात बस जमा करताना वाहकाला या बसमध्ये १ . २० लाखांच्या दागिन्यांची बॅग सापडली व त्याने ही बॅग संबंधीत प्रवाशाला देत प्रामाणिकपणाचा प्रत्यय आणून दिला . २७ ऑक्टोबर रोजी रोजी नांदेड ते सगरोळी बस क्र . एम एच २० बीएल २३० या बसवर चालक आर . एन . भालेराव व वाहक एस . एम . याबनोड हे कर्तव्यावर होते . नांदेडहून सकाळी ९ . ३० वाजता निघालेल्या बसमध्ये सगरोळी येथील रहिवासी व पुणे येथे अभियंता महेश पायरे व त्यांच्या पत्नी रूक्मीनी पायरे हे सगरोळीला जाण्यासाठी निघाले होते . सगरोळी गाव आल्यानंतर पायरे दाम्पत्य आपली बॅग सोबत घेऊन जाण्याऐवजी बसमध्येच विसरले . नंतर बसच्या फेऱ्या संपल्याने बस आगारात जमा करण्यासाठी नेत असताना दुपारी १२ . ३० वाजता वाहक याबनोड यांना कोणी तरी प्रवासी बसमध्येच बॅग विसरल्याचे लक्षात आले . त्यानंतर याबनोड यांनी वाहतुक निरीक्षक ओमप्रकाश इंगोले व वाहतूक निरीक्षक खुशाल ओलापाडे यांना याबाबत माहिती दिली . अधिकाऱ्यांनीही लगेचच बॅग ताब्यात घेत बॅगचा पंचासमक्ष पंचनामा केला . बॅगेत आढळून आलेल्या भ्रमणध्वनीवर फोन करून चौकशी केली असता सगरोळीत उतरलेल्या पायरे दाम्पत्याची ही बॅग असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना १ . २० लाखांचे दागिने या बॅगमध्ये आढळून आले . दागिन्यांची ही बॅग अधिकाऱ्यांसमक्ष पायरे दाम्पत्यांना परत करुन प्रामाणिकपणाचा प्रत्यय वाहक एस . एम . याबनोड यांनी आणून दिला . प्रवाशाची विसरलेली दागिने असलेली बॅग चालक व वाहकाने प्रामाणिकपणा दाखवून एसटी महामंडळाचा अभिमान वाढविला . त्याबद्दल त्यांचे बिलोली आगारप्रमुख संजय वाळवे यांनी कौतुक केले आहे . तसेच पायरे दाम्पत्यानेही चालक - वाहकांचे आभार मानले आहेत . २१ व्या शतकातही चालक व वाहकाने प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे .

0 comments:

Post a Comment