सोशल मिडिया वर #मी_भाजप_सोडतोय ट्रेंड
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून आज तीन हप्त्याच्या वर दिवस होत आले आहेत परंतु अजूनही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटता दिसत नाहीय. महाराष्ट्रातील विधानसभा निकाल लागल्या नंतर भाजप आणि सेना या दोन्ही पक्ष्यान मध्ये मुख्यमंत्री आमचा व्हावा म्हणून रस्सी खेच चालू होती असे असतांनाच त्या दोन्ही पक्ष्यान मधला वाद शांत होण्या ऐवजी वाढला आणि शेवटी शिवसेनेने भाजप ची साथ सोडली आणि राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्ष्यांच्या रागेत जाऊन बसले आणि आता हे तिन्ही पक्ष मिळून महाराष्ट्रात सत्ता देखील स्थापन करणार आहेत.
असे असताना आता भारतीय जनता पार्टी चे काही समर्थक भाजप ची साथ सोडतांना दिसत आहेत असेच निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन हे सोशल मिडिया वर ट्रेंड होते तर आता त्याच प्रमाणे मी भाजप सोडतोय हा ट्रेंड सध्या सर्व सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे बरेच से समर्थक त्यांना भाजप बद्दल काय वाटत आहे ते लिहित आहेत आणि मी भाजप सोडतोय हा टग वापरत आहेत. यावरून भाजप कार्यकर्त्यान मध्ये किती नाराजी आहे ते पाहायला मिळत आहे.सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्ण पणे ढवळून निघाले आहे सध्या महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार कुणाचे नाही यावरून सतत गोंधळ पाहायला मिळत आहेत महाशिवआघाडी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार होते परंतु अचानक त्यांची आजची भेट रद्द करण्यात आली आणि आता पुन्हा महाराष्ट्रात राजकीय गोंधळाची परिस्तिथी निर्माण झाली आहे







0 comments:
Post a Comment