जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

20 November 2019

राष्ट्रीय विधी सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत बिलोली येथे भव्य रँली

बिलोली - बिलोली तालुक्यात येथे विधी सेवा समिती , अभियोवत्ता संघ व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त दिनांक १९ / ११ / २०१९ रोजी भव्य आयोजन करण्यात आले . यात तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री व्ही . के . मांडे , जिल्हा न्यायाधीश - बिलोली श्रीमंती एस . ए . कुलकर्णी , सह दिवाणी न्यायाधीश , गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला . या रॅली मध्ये विविध शाळेचे विद्यार्थी फलकाचे संदेश देण्यात आले या 
संदेश मध्ये साधता संवाद संपतो वाद , न्याय तुमच्या दारी , आधी विद्यादान मग कन्यादान , पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा , भांडण्यापेक्षा समझोता बरा मिळेल त्यातच आनंद करा , बेटी बचाव बेटी पढाव असे विविध संदेश देण्यात आले . या रॅलीमध्ये बिलोली येथील अनेक शाळेचा समावेश होता त्यामध्ये विद्यानिकेतन प्रा.विद्यालय, सरस्वती विद्यालय , उर्दू विद्यालय , जि . प . हायस्कूल , लिटल फ्लाँँवर , विजय पटने , अंतर भारतीय विद्यालय , विद्या ईत्यादी शाळेचा समावेश होते . या रॅली मध्ये डाँ नागेश लखमावार अधिक्षक ग्रामीण रुग्णालय बिलोली , अँड . रामेकर , कुंडलवाडीकर , सरकारी वकील तळणीकर , कुलकर्णी , देशमुख , येरावार , म्हेजे , देशमुख , बेग , झाडे , व सर्व न्यायालयीन कर्मचारी व शाळेचे शिक्षक , शिक्षिका सहभाग होते .

0 comments:

Post a Comment