जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

03 November 2019

*आठ वेळा विजयी काँग्रेसचे थोरात होऊ शकतात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष*


(मुंबई)राज्यात चौदावी विधानसभा १० नोव्हेंबरच्या आत अस्तित्वात येणार आहे त्यात / आहे . त्यात २८८ आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याचा मान काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष व आठ वेळचे आमदार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मिळण्याची शक्यता आहे . नव्या विधानसभेत हंगामी अध्यक्षपदी सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याच्या निवडीची प्रथा आहे . ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी विधिमंडळ सचिवालयराज्यपालांना सादर करते व त्यानंतर ते हंगामी अध्यक्षांच्या नावाची निवड में करतात . १४ व्या विधानसभेतील १० र ज्येष्ठ सदस्यांची यादी सचिवालयाने शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली . त्यामध्ये । सर्वाधिक ज्येष्ठ म्हणून काँग्रेसचे । नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव । पहिल्या क्रमांकावर आहे . त्यानंतर | राष्ट्रवादीचे दिलीप वळसे - पाटील । सात वेळा , राष्ट्रवादीचे अजितपवार व भाजपचे बबनराव पाचपुते , राष्ट्रवादीचे जयंत पाटील , भाजपचे कालिदास कोळंबकर , काँग्रेसचे के . सी . पाडवी हेही सातव्यांदा विधानसभेत आले आहेत . भाजपचे आमदार व माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची या वेळी सहावी टर्म आहे . तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहाव्यांदा विधानसभेत येत आहेत .

0 comments:

Post a Comment