जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

05 March 2019

*मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी तरुणाची जलसमाधी*

बीड : लाईवन्यूज ऑनलाईन - मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी केज तालुक्यातील एका तरुणाने पाली धरणात उडी माररून जलसमाधी घेतल्याची घटना मंगळवारी घडली . पोलिसांना काठावर एक बॅग सापडली असून त्यात मोबाईलमध्ये त्याने आत्महत्येचे कारण रेकॉर्ड केले आहे . संजय ज्ञानोबा ताकतोडे असे तरुणाचे नाव आहे . मागील अनेक वर्षापासून मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे . त्यासाठी वेळोवेळी आंदोलने व मोर्चे मातंग समाजाकडून काढण्यात आले . परंतु सरकारकडून याची दखल घेतली जात नाही , असा आरोप करत मंगळवारी संजय ताकतोडे याने या स्वतंत्र
 अदोलनासाठी | पाला धरणाजवळ पाण्यात उडा मारून जलसमाधी घेतली . त्यानंतर याची माहिती मिळाल्यावर बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तेथे धाव घेतली . पोलिसांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे . काठावर त्याची बॅग  पोलिसांना सापडली असून त्यात त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचे कारण त्याने रेकॉर्ड करून ठेवले आहे .

0 comments:

Post a Comment