जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 July 2024

ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांचा वाढदिवस भोकर येते साजरा

भोकर प्रतिनिधी:तालुका प्रतिनिधी 

   गोल्ला गोल्लेवार यादव समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांचा वाढदिवस दि.७ जुलै २०२४ रोजी भोकर शहरातील गणराज रिसॉर्ट येथे विविध उपक्रमांनी अतिशय उत्साहपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला.
   यावेळी गोल्ला गोल्लेवार समाजाचे कुलदैवत भगवान श्रीकृष्ण यांचे विधिवत पूजन करण्यात आले.तदनंतर राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर केक कापून वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर ओबीसी चळवळीतील रामेश्वर गौड महाराज बारडकर,प्रगतशील शेतकरी मारोती वागदकर आदींची उपस्थिती होती.
    या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा फाईल फोल्डर भेटवस्तू देऊन यथोचित्त सन्मान करण्यात आला तसेच भोकर तालुक्यातील ६७ गावातील गरजू,गरीब, अल्प-भूधारक प्रत्येक गावातील १० शेतकऱ्यांना एकूण ७०० चार्जिंग बॅटरीचे वाटप  करण्यात आले.त्यानंतर नांदेड भोकर रोडच्या दुतर्फा वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संबंध नांदेड जिल्ह्यातील त्यांचे हितचिंतक,मित्रपरिवार व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना उदंड आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
   या कार्यक्रमास भोकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधवराव अमृतवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती बालाजी शानमवाड, संचालक उज्वल केसराळे, रामचंद्र मुसळे, सतीश देशमुख, कृष्णा वागतकर, मारोती अंगरवार, मोहन राठोड, शिवसेना उ.बा.टा.गटाचे तालुकाप्रमुख संतोष आल्लेवार, माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड, प्रहार तालुकाध्यक्ष अॅड.शेखर कुंटे, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष ॲड. शिवाजी कदम, किसान एकता संघाचे मराठवाडा अध्यक्ष प्रतापराव कल्याणकर,माजी उपनगराध्यक्ष मुदखेड संजय आऊलवार,मारोती बल्लाळकर आदींसह तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन,ग्रा.पं.सदस्य व शेतकरी बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या वेळी आपले  
राष्ट्रीय पुरोगामीचे मराठवाडा महासचिव व तसेच अंबुज प्रहार संपादक श्रीमान उत्तमरावजी बाबळे
ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड 
यांनी राबवित असलेल्या विविध 

सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून 
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल कदम. विशाल जाधव. साईनाथ बंडोड. अंबादास बोयावार.
पत्रकार संघातर्फे त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांनी मित्रमंडळीतर्फे वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांना मनापासून धन्यवाद दिले व तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव,शेतकरी वर्ग व विविध संघटनाचे पदाधिकारी,हितचिंतक,मित्रमंडळी यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
   या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अंबादास आटपलवाड गुरुजी यांनी केले तर प्रस्तावना पंडित तोटेवाड सर यांनी केली.शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधवराव अमृतवाड यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

0 comments:

Post a Comment