बिलोली: शंकरनगर अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणात आरोप असलेले दोन शिक्षक आज भारतीय प्रजासत्ताक दिनी बिलोली पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत . याप्रकरणातील एक शिक्षक 28 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत आहे .दिनांक 17 जानेवारी रोजी रामतीर्थ पोलीस ठाण्यात एका आईच्या तक्रारीवरुन तिच्या सहावीत शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार केल्याची तक्रार आहे . या तक्रारीवरुन रामतीर्थ पोलिसांनी शाळेचे शिक्षक सय्यद रसूल सय्यद महेबूब साब याच्यासह डी एस पाटील , राजुळे आणि शेळके सोबत पोषण आहार बनविणारी महिला अशा पाच जणांविरुध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ( पोस्को ) नुसार गुन्हा दाखल केला . या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस उपअधीक्षक डॉ . सिध्देश्वर धुमाळ यांच्याकडे देण्यात आला . पण गुन्हा अहमदपूरच्या पोलीस उप अधीक्षक डॉ अश्विनी पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला . पोलिसानी दिनांक बावीस जानेवारी रोजी रामतीर्थ येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक सय्यद रसूल सय्यद महेबूब साब चौरेचाळीस यांना ताब्यात घेतले . बिलोली न्यायालयाने त्यांना 28 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले होते . फरार असलेल्या शिक्षकांना शोधून काढण्यासाठी पोलिसानी जंग जंग पछाडले . शिक्षकांवर दबाव वाढतच राहिला . आज सर्वत्र एकाहतरवा वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होत असतांना संपूर्ण भारतभर आनंदाचे वातावरण होते . अचानकच दुपारी एक वाजेच्या सुमारास बिलोली पोलीस ठाण्यात दोन माणसे अवतरली . त्यांनी आपली नावे धंनजय शिवराज शेळके ( 52 ) राहणार. वंजारवाडा ता . जळकोट जिल्हा लातूर आणि प्रदीप धोंडिबा शेळके ( 46 ) राहणार . कामरजपल्ली तालुका बिलोली सांगितली . आम्ही दोघेही रामतीर्थ येथील शाळा साईबाबा विध्यालयत मुख्याध्यापक आहोत असे सांगितले . बिलोलीच्या ठाणे अंमलदाराने या दोन माणसांची माहिती आपले पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना सांगितली . या गुन्ह्याचा तपास .डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या कडे असल्याने शिवाजी डोईफोडेने हि माहिती त्यांना दिली .डॉक्टर.अश्विनी पाटील यांच्या सूचनेनुसार आता त्या दोन्ही शिक्षकांना अटक होईल आणि उद्या .डॉक्टर.अश्विनी पाटील स्वतः त्यांना बिलोली न्यायालयात हजर करतील आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु होणार आहे . रामतीर्थ येथे बालिकेवर अत्याचार करण्याचा आरोप असलेल्या तीन जणांना आता अटक झाली आहे .
26 January 2020
Home »
» रामतीर्थ येथील अत्याचाराच्या आरोपातील 2 शिक्षक बिलोली पोलीस ठाण्यात अवतरले







0 comments:
Post a Comment