नांदेड | बिलोली शहरात एका मुकबधीर मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना 8 डिसेंबरच्या रात्री कधी तरी घडली होती . या प्रकरणात पोलीसांनी काल एका आरोपीला पकडले आहे . पकडलेल्या आरोपीला बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी 16 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे . दुसरा एक आरोपी पोलीसांनी आज ताब्यात घेतला आहे . त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे . आज दि .13 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बिलोली येथील गुन्ह्याची माहिती सांगितली . याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे , पोलीसचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर धुमाळ , स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थिती होती . दि .9 डिसेंबर रोजी त्या युवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 201/2020 दाखल झाला होता . त्यावेळी त्या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 302,376 ( एल ) ( एम ) 354,254 ( डी ) आणि 201 या कलमांचा समावेश होता . याप्रकरणी बिलोलीचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांनी साईनाथ निमोड नावाच्या एका आरोपीला पकडले होते . तो तुरूंगात आहे . याप्रकरणात आणखी आहेत काय याचा शोध घेणे होते .त्यासाठी पोलीसांनी जवळपास 200 ते 300 लोकांचे जाब - जबाब नोंदवले . त्यात एकूण 4 जणांनी हा अत्याचारा प्रकार घडविल्याची बाब पोलीसांच्या समक्ष आली . त्यासाठी नांदेडचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे , अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे , विजय कबाडे यांच्या नेतृत्वात 6 पथकांची स्थापना केली . या पथकांनी परभणी जिल्ह्यातील पुर्णा , नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद , उमरी , मुदखेड , हिमायतनगर आणि तेलंगणा राज्यातील कामारेड्डी , निर्मल आणि निजामाबाद या ठिकाणी आरोपींचा शोध घेतला . त्यातील एका आरोपीला पोलीसांनी 11 जानेवारी रोजी अटक केली.आणि त्याला न्यायालयासमक्ष हजर केले.बिलोलीचे जिल्हा न्यायालयाधीश विक्रमादित्य मांडे यांनी त्या आरोपीला 16 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले यानंतर आज दि .13 जानेवारी रोजी पसरा आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतला आहे .या प्रकरणात आणखी एक आरोपी पोलीसांना शोधायचा आहे . आज ताब्यात घेतलेल्या आरोपीला पोलीस उद्या न्यायालयात हजर करतील .11 जानेवारी रोजी पकडलेल्या आरोपी नंतर या गुन्ह्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे 3 ( 1 ) ( डब्लू ) 3 ( 2 ) वाढविण्यात आली आहेत . त्यामुळे या पाचा तपास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर धुमाळ यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे . पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यवाहीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर , सहाय्यक पोलीस निरिक्षक मुत्तेपौड , केंद्रे , करीम खान पठाण , परगेवार , भारती , पोलीस उपनिरिक्षक सय्यद , झाकीकोरे , पोलीस कर्मचारी कोत्तापल्ले , नरावाड , आचेवाड , शिवणकर , झेलेवाड , सोनकांबळे यांनी गुन्ह्याची माहिती , त्याचे पुरावे जमवून आरोपींना गजाआड करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी कौतुक केले आहे .
13 January 2021
Home »
» मुकबधीर युवतीवर अत्याचार करून तिचाखून करणारे दोन युवक गजाआड-







0 comments:
Post a Comment