बिलोली:तालुक्यातील केरूर येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पाँझीटिव्ह आला आहे.सदरील रूग्णावर बिलोली नगर परिषदेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.काही दिवसापासून जिल्हासह काही तालुक्यातही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत होते त्यामध्ये आता बिलोली तालुक्याचाही नंबर लागलेला आहे.त्यामुळे बिलोली तालुक्यात आता खळबळ उडाली आहे.सदरील व्यक्ती हा काही दिवसांपुर्वी हैद्राबादहून नांदेड येथे आला होता त्यानंतर तो व्यक्ती नांदेड येथील लंगर परिसरात काही काळ व्यथित केला होता.त्यानंतर नांदेड येथुन नरसी पर्यंत तीनचाकी अँटोने आला नंतर नरसी येथुन बिलोली पर्यंत ट्रक ने प्रवास केलेल्या सदर व्यक्तीस कोरोना सदृष लक्षणे आढळून आल्याने सदर रूग्णास बिलोलीच्या सी.सी.सी केंद्रात दाखल करून त्याची चाचणी करण्यात आली. त्या व्यक्तीती प्रथम घेण्यात आलेल्या चाचणीत सदर रूग्णाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला होता.माञ लंगर परिसरातील काही व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्याने व आपणासही तशीच लक्षणे दिसत असल्यामुळे त्या रूग्णाने स्वतःहुन पुन्हा चाचणी करण्याची मागणी केली होती.रूग्णाच्या म्हणण्या नुसार त्याची दुसऱ्यांदा चाचणी केली असता दुसरा अहवाल पाँझिटीव्ह आला असल्याची माहिती बिलोलीचे ता आरोग्य अधिकारी वाडेकर यांनी दिली आहे.या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने ज्या ट्रक ने नरसी ते बिलोली पर्यंत चा प्रवास केला होता त्या ट्रक ड्रायव्हर ला देखील विलगीकरणात ठेवण्यात आल्याचेही सांगितले.तसेच नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
22 May 2020
Home »
» बिलोली तालुक्यातील केरूर येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह







0 comments:
Post a Comment