जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 May 2020

ग्रीन झोनमधील नांदेड ऑरेंजझोनमध्ये दाखल

नांदेड,:- कोरोनाा लॉकडाऊनची अंमलबजावणी कोटेकारेपणे अमलात आणल्यामुळे ग्रीनझोनमध्ये गेलेल्या नांदेडला मात्र सहा रुग्ण वाढल्यामुळे ऑरेंज झोनमध्ये जावे लागले आहे. ही रुग्णसंख्या शून्यावर आल्यास पुन्हा नांदेड शहर ग्रीन झोनमध्ये येऊ शकते.केंद्र सरकारने मागच्या महिन्यात साधारपणे ज्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही, अशा जिल्ह्यांची विभागणी ग्रीन, काही रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज तर मोठया संख्येने रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये टाकले होते.
मराठवाडयात औरंगाबाद हा एकमेव जिल्हा रेडझोनमध्ये आहेत, हिंगोलीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपााटयाने वाढत असल्याने रेडझोनमध्ये जाऊ शकतो. मात्र तुर्त तरी ऑरेंज झोनमध्ये आहेत.मराठवाडयातील उस्मानाबाद हा एकमेव जिल्हा ग्रीनझोनमध्ये असून उर्वरीत सहा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहेत.यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, लातूर, बीड हे जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत, तर औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या दोनशेपार झाली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून रेडझोनमध्ये आहे. उस्मानाबादमध्ये पहिल्यापासून रूग्ण संख्या शून्य आहेत. विशेष म्हणजे, शेजारचा सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठी असताना सुद्धा उस्मानाबाद जिल्हा सुरक्षीत आहे.नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 6 असून यामध्ये पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण निगेटीव्ह होऊन मरण गुरुवारी मरण पावला,तर सेलू येथून उपचारासाठी आलेलीा कोरोना संसर्ग असलेल्या महिलेचे सुद्धा गुरुवारी रात्री निधन झाले होते. त्यानंतर पंजाबहून आलेल्यांमध्ये तीन जण कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने नांदेड पुन्हा हादरले आहे. रात्री अजूनही काही संशयित रुग्णांचे अहवाल येणार आहे,हे अहवाल काय असतील, याकडे नांदेडकरांच्या नजरा लागून आहेत.

0 comments:

Post a Comment