नांदेड: हिंगोली जिल्ह्यात ठराविक दुकाने उघडण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसाच निर्णय नांदेडच्या दुकानाबाबत घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपुल इटनकर यांनी संकेत दिले होते. त्यामुळे दुकाने उघडण्यासंबंधी डॉ. इटनकर हे सायंकाळपर्यंत काय निर्णय देतात, याकडे व्यापार्यांसह नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.हिंगोली जिल्हाधिकारी डॉ. रुचेश जयवंशी यांनी शहरी व ग्रामीण भागातील इलेक्ट्रीकल, स्टेशनरी, किराणा, भाजीपाला, दूध, परवाना धारक चिकन/मटनशॉप, बेकरी व स्वीट मार्ट ही आठ प्रकारचे दुकाने एक दिवसाआड सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरु करण्याबाबत निर्णय झाला आहे.सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. इटनकर यांनी दुकाने उघडण्याविषयी मंगळवार सायंकाळपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नांदेडसह व ग्रामीण भागातील व्यापार्यांच्या नजरा जिल्हाधिकार्यांकडून नेमका काय निर्णय येतो, याकडे लागल्या आहेत.चौकट
मागच्या पावणे दोन महिन्यांपासून सर्व प्रकारचे व्यापार, व्यवसाय हे बंद आहेत. लाखो लोकांना टाळेबंदीमुळे घरी अडकून पडावे लागले आहेत. या सगळया पार्श्वभूमिवर व्यापार्यांना आस्थापने सुरू करण्याबाबत दिलासा दायक निर्णयाची आस लागून आहेत. दुकाने उडण्यास मुभा दिल्यास अर्थचक्र रुळावर येऊ शकते.







0 comments:
Post a Comment