जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 May 2020

चंद्रपुर येथून आणलेले ते 3 कोरोना रुग्ण नाहीत - विजयकुमार मगर -

नांदेड | चंद्रपूर येथून आणलेले तीन युवक हे पळून गेलेले कोरोना रुग्ण नाहीत अशी माहिती पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी दिली . या तिघांनी पळून गेलेल्या रुग्णांच्या नावाने फेसबुकवर एक खोटे खाते तयार केल्याची माहिती आमच्याकडे आहे . आम्ही त्या संदर्भाने चौकशी करीत असल्याचे विजयकुमार मगर यांनी सांगितले . 6 मे रोजी नांदेडचे पोलीस पथक नियंत्रण कक्षाच्या डायरीमध्ये आम्ही वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक 276 / 2020 , भारतीय दंड संहितेच्या कलम 188 चे तीन आरोपी आणण्यासाठी चंद्रपुरकडे रवाना असे लिहुन पोलीस गाडी क्रमांक एम . एच . 26 आर . 651 आणि सोबत एक रुग्णवाहिका घेवून चंद्रपुरकडे रवाना झाले . गुन्हा क्रमांक 276 मधील आरोपी हे कोरोना बाधीत रुग्ण आहेत असे त्या 276 क्रमांकाच्या प्राथमिकीमध्ये लिहिलेले आहे . चंद्रपूर येथून नांदेडच्या पथकाने तीन युवकांना ताब्यात घेतले आणि 7 मे रोजी रात्री परत आले . त्यावेळी चंद्रपुर पोलीसांनी लिहिलेले एक पत्र वायरल झाले . ज्यावर कोणाची स्वाक्षरी दिसत नाही . त्यात असे लिहिले आहे की , नांदेड येथून आलेल्या तीन नागरीकांना संशयावरुन जिल्हा प्रशासन व पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले होते . पोलीस व कोविड नियंत्रण कक्ष नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीसांसोबत संपर्क केला असता चंद्रपुर येथील ताब्यात घेतलेल्या तीन इस्माची नावे ही नांदेड येथून पसार झालेल्या इसमांसोबत मिळते जुळते नसल्याची मिळाली . तरीही पुढील खबरदारी म्हणून नांदेड येथील पथक एंबुलेंससह चंद्रपुर येथे येवून , माणिकगड येथून ताब्यात घेतलेल्या नांदेड येथील तीनही नागरीकांना पुढील तपासणी व पडताळणी कामी नांदेड येथे रवाना झाले आहेत . अशा प्रकारे तीन लोकांना घेवून परत आल्याची नोंद सुध्दा नियंत्रण कक्षाच्या डायरीत घेण्यात आली . ते तीन युवक वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचे आरोपी आहेत . हा महत्वपूर्ण दुवा देणारा पोलीसांचा तो खबरी प्रशंसनिय आहे . कारण या युवकांनी चंद्रपुर ते नांदेड प्रवासात स्वत : चा एक व्हिडीओ वायरल केला ज्यात ते सांगत होते की , आम्ही ते आरोपी नाहीत . रात्री येथे पोहचल्यावर आलेल्या पथकाने पुन्हा नियंत्रण कक्षाच्या डायरी आपल्या नोंद केली . खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात हे तीन वजिराबादच्या गुन्ह्यातील आरोपी नव्हते असे पण लिहिले आहे . आज दि . 8 मे रोजी पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांना या तिन लोकांबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की , चंद्रपुरहून आणलेले तीन युवक हे वजिराबादच्या गुन्हा क्रमांक 276 मधील आरोपी नाहीत . या तिघांबद्दल आम्हाला प्राप्त असलेल्या माहितीनुसार त्यांनी पळून गेलेल्या तीन रुग्णांच्या नावाने फेक खाते फेसबुकवर बनविले . याबाबत आम्ही तपासणी करीत आहोत . त्यानंतर पुढील दिशा ठरेल . या तिघांना आम्ही 7 मे रोजी क्वॉरंटाईन केले असून , आज त्यांचे स्वब कोरोना तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत . त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही होईल असे विजयकुमार मगर म्हणाले . “

0 comments:

Post a Comment