नांदेड:- नांदेड शहरात शुक्रवार दि. 8 मे रोजी तीन नव्या कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. या तिघांमध्ये अबचल नगर एक महिला व पुरुष तसेच रवी नगर येथील एक पुरुषाचा समावेश आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 38 झाली आहे. यात चार जणांचा मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी दिली.नांदेड येथील संशयित 23 जणांचे थ्रोट स्वॅब पाठविण्यात आले होते. यातील सर्वच्या सर्व स्वॅब शुक्रवार दि. 8 मे रोजी सकाळी प्राप्त झाले, असून यात 20 स्वॅब निगेटीव्ह आले, तर 3 स्वॅबचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये 36 वर्षीय महिला व 38 पुरुष हे दोघे अबचल नगर येथील रहिवासी आहेत. तर एक 35 वर्षीय पुरुष रवीनगर भागातील रहिवासी आहे. अबचल नगर येथील नवे दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण हे बांधित असलेल्या नातेवाईकांच्या संपर्कातील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यापूर्वी या रुग्णांचा पहिला थ्रोट अहवाल निगेटीव्ह आला होता. मात्र दुसर्या तपासणी केली, असता रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. या तिघांवर कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.
08 May 2020
Home »
» अबचल नगर येथील 2 तर रवीनगर येथील एक जण कोरोना पॉझिटीव्ह; रुग्णसंख्या 38







0 comments:
Post a Comment