नांदेड दि 23 | दि 23 मे 2020 रोजी सांयकाळी प्राप्त झालेल्या एकूण 135 अहवालानुसार 120 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत . त्या पैकी 6 अहवाल पॉसिटीव्ह व सकाळी 3 रुग्णांचे स्वाब पॉसिटीव्ह आल्यामुळे नांदेड ची पॉसिटीव्ह एकूण रुग्णांची संख्या 125 झाली आहे . वर्ष 6 )
आता प्राप्त झालेल्या 6 पॉझिटिव रुग्णांपैकी करबला भागातील दोन रुग्ण ( 1 पुरुष वय वर्ष 38 , 1 मुलगी वय वर्ष ६ व कुंभार टेकडी येथील 2 रुग्ण ( 1 पुरुष वय वर्षे 15 व 1 स्त्री वय वर्ष 28 ) आणि उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील 2 रुग्ण ( 1 पुरुषं वय वर्ष 24 व 1 स्त्री वय वर्ष 22 ) असे तीन पुरुष , एक 6 वर्षी मुलगी , व दोन स्त्रिया असे एकूण 6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळे असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे .
व तसेच ग्रामीण रुग्णालय बारडच्या कोविड सेंटर येथील 1 रुग्ण डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2 रुग्ण आज दिवसभरात असे 3 रुग्ण बरे झाल्यामुळे , त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे .
आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यातून 125 रुग्णांपैकी 55 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे व उर्वरित 62 रुग्णावर औषध उपचार चालू आहेत .
एकूण 125 रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे , 55 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे , उर्वरित 62 रुग्णांपैकी 6 रुग्ण हे डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड पंजाब भवन कोवीड सेंटर , यात्री निवास कोवीड सेंटर येथे 49 रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5 रुग्ण , ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे .
नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल .
•आज दिवसभरात 9 पॉझिटिव रुग्णांची भर
•एकूण रुग्ण संख्या 125 वर
• 55 बरे होऊन घरी 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार .
• 6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू .
•62 रुग्णांवर उपचार सुरू .
दरम्यान नागरिकांनी सुरक्षित राहावे अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .







0 comments:
Post a Comment