नांदेड:जिल्ह्यातील आज प्राप्त झालेल्या एकूण 149 अहवालापैकी 144 निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाले असून आज एकही नवीन रुग्ण पॉझीटीव्ह आढळला नाही . आजपर्यत नांदेड जिल्हयातील कोराना रुग्णांची एकूण संख्या 137 एवढी आहे . बुधवार 27 मे रोजी एनआरआय भवन व यात्री निवास कोविड सेंटर येथील 7 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . आतापर्यंत 137 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 86 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर उर्वरीत 44 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यातील दोन महिला ( वय -52 व 55 वर्षे ) रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे . बुधवार 27 मे रोजी कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे . सर्वेक्षण -1 लाख 36 हजार 132 , घेतलेले स्वब 3 हजार 502 , निगेटिव्ह स्वब 3 हजार 85 , आज रोजी पॉझिटिव्ह स्वब संख्या- निरंक , एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 137 , स्वब तपासणी अनिर्णीत संख्या 140 , स्वब नाकारण्यात आलेली संख्या 14 , मृत्यू संख्या 7 , रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 86 , रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 44 , स्वब तपासणी चालू रुग्ण संख्या 122 एवढी आहे . काल मंगळवार 26 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 122 स्वब तपासणी अहवाल रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होतील . तर बुधवार 27 मे रोजी 42 रुग्णांचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे . त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळीपर्यंत प्राप्त होतील . एकुण 137 रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 86 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . 44 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड पंजाब भवन कोवीड केअर सेंटर , यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 21 रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5 , ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहे . सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थितीत स्थिर आहे . जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू अॅप " डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अॅप सतर्क करण्यास मदत करते , असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी केले आहे . .
नांदेड जिल्हा : कोरोना विषाणू संसर्गाबाबत बुधवार 27 मे रोजी सायं . 5 वाजेपर्यंतची
आकडेवारी
• एकूण संशयित – 3 हजार 511 ,
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या -3 हजार 197 ,
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1 हजार 682 ,. •अजून निरीक्षणाखाली असलेले . 221 , ·
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 45 .
•घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3 हजार 152 , • आज घेतलेले नमुने - 42 ,
• एकुण नमुने तपासणी -3 हजार 502 ,
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -137 ,.
•पैकी निगेटीव्ह - 3 हजार 85 ,
•नमुने तपासणी अहवाल बाकी -122 ,. •नाकारण्यात आलेले नमुने - 14 ,
• अनिर्णित अहवाल 140 ,
•कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – 86 ,
•कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या - 7 ,
▪जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 36 हजार 132 जणांना घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत , अशी माहिती नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे .







0 comments:
Post a Comment