नांदेड:- कोरोनाच्या रुग्णांची संख्या 5 ने वाढली आहे. या संबंधीचा अहवाल शुक्रवार दि.29 मे रोजी वाढली आहे. यामध्ये दोन हिंगोलीचे दोन रुग्ण नांदेडमध्ये आढळले आहेत,त्यांच्यावर जीएमसीमध्ये उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी सकाळी 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 97 अहवाल निगेटिव्ह,2 अहवाल हे अनिर्णित आले ,तर 5 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णाची संख्या 143 इतकी झाली आहेत, कोरोनामधून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 90 इतकी झाली आहे. गुरूवारी नांदेड शहरातील लोहारगल्ली येथे 1रुग्ण आढळला आहे. तसेच 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज सापडलेले पाच रुग्णांमध्ये मिलतनगर येथे 32 वर्षीय पुरुष,28 वर्षीय लोहरगल्लीमधील पुरुष,40 वर्षीय मुखेडमधील महिला,तर हिंगोली जिल्ह्यातील कसबे येथिल 38 व 35 वर्षीय पुरुषाचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.







0 comments:
Post a Comment