जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

19 May 2020

देशी दारूच्या उलटलेल्या ट्रकवर तळीरामांचा डल्ला


उमरी- दोन महिन्यांच्या खंडानंतर देशी दारूची च्या विक्रीस दुकानांवर मुभा मिळाल्यामुळे नांदेड येथून उमरीकडे देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक जामगावजवळ उलटला. याची माहिती मिळताच तळीरामांनी घटनास्थळी गर्दी करत काही बॉक्स लांबविले. त्यामुळे अनेक तळीरामांना आयत्या दारूच्या बॉटल्या मिळाल्याने वनवास मिटल्यासारखे झाले.मंगळवापासून जिल्ह्यात सर्व देशी, विदेशी व बिअर शॉपी उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार उमरी येथील देशी दारू दुकानाकडे माल पोहचविण्यासाठी एम.एच. 43 वाय.1102 क्रमांकाची ट्रक नांदेड येथून उमरीकडे निघाली होती. परंतु उमरीपासून पाच किलोमीटर अलिकडे जामगाव जवळ उतराव चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पल्टी झाली. ही घटना मंगळवार दि. 19 मे रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.या गाडीत देशी दारूची 414 बॉक्स होते. त्यातील 100 बॉक्समध्ये काही बॉक्स फु टले तर काही बॉक्स तळीरामांनी लांबविले. उवरलेले 314 बॉक्स दुसरीगाडी बोलावून घेत त्या गाडीत भरून उमरीकडे पाठविण्यात आल्याचे आमच्या बातमीदाराने सांगितले.
—–
तळीरामांमध्ये आनंदी आनंद
गाडी पल्टी झाल्याची घटना वार्‍यासारखी पसरल्यानंतर तळीरामांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस येण्यापूर्वी काही जण बॉक्स घेऊन पसार झाले. बर्‍याच दिवसांपासून चढया दराने विकत घेऊन पिणार्‍यांसाठी फु कटात दारू मिळाल्याने आनंदी आनंद झाला बघायला मिळाले.

0 comments:

Post a Comment