जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

14 May 2020

तीन जणांचे अहवाल कोरेाना पॉझिटीव्ह

नांदेड:-प्रलंबित असलेल्या 126 जणांचे अहवाल गुरुवार दि. 14 मे रोजी सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाले आहेत. यामध्ये तीन जणांचे स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आले तर 121 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 66 इतकी झाली आहे.

गुरुवारी दुपारी 157 पैकी 109 अहलवाल निगेटीव्ह आले होते. पाच वाजता 126 जणांचे अहवाल प्रयोगशाळेकडून आले आहेत. यात 3 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह निघाला आहे. या नवीन कोरोना पॉझिटीव्ह निघालेल्या रुग्णांना पंजाब भवन किंवा लंगर यात्री निवास येथील कोविड केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

—–
25 जण कोरोनामुक्त
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार घेत असलेल्या 3 व यात्रीनिवास कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेल्या 22 अशा एकूण मिळून 25 जण हे कोरोनामुक्त झाले, असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात 8, बारड-1 व यात्री निवास येथे 24 जणांवर उपचार सुरु आहेत.

0 comments:

Post a Comment