मुखेड: येथील कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती प्रशासनाकडून कळविण्यात आली. मयत महिला ही मुखेड येथील आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 झाली आहे. यामध्ये आज सांयकाळी 5-00 पर्यंत आढळलेले 5 पॉझिटिव्ह रुग्ण हे पुढील भागातील आहेत . मिल्लत नगर भागातील 32 वर्षांचा 1 पुरुष रुग्ण , लोहार गल्ली भागातील 28 वर्षे वयाचा 1 पुरुष रुग्ण , मुखेड येथील गोळी गल्ली येथील 40 वर्ष वयाची 1 स्त्री रुग्ण व कळमनुरी जि . हिंगोली येथील 38 वर्ष वयाचा 1 पुरुष रुग्ण तर 35 वय वर्षाची 1 स्त्री रुग्ण यांचा 5 रुग्णात समावेश आहे . यापैकी 4 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत . मुखेड येथील एका महिला रुग्णाचा डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे मृत्यू झाला आहे . कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे . सर्वेक्षण -1 लाख 38 हजार 466 , घेतलेले स्वब 3 हजार 751 , निगेटिव्ह स्वब 3 हजार 238 , आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या -05 , एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 143 , स्वब तपासणी अनिर्णीत संख्या 143 , स्वब नाकारण्यात आलेली संख्या 14 , मृत्यू संख्या 8 , रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 99 , रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 36 , स्वब तपासणी चालू रुग्ण संख्या 209 एवढी आहे .
मिलतनगर, लोहारगल्ली, हिंगोली येथील दोन व मुखेड येथील चाळीस वर्षीय महिलेचा समावेश आहे.त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या 143 इतकी झाली आहे. तसेच आज कोविड के अर सेंटर यात्री निवास येथील 8 व मुखेड येथील एका रुग्णास रुग्णालयातून कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरेानामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 99 इतकी तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 36 एवढी राहिली आहे. तसेच दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
—–
मयत महिलेवर नांदेड येथे अंत्यसंस्कार
शुक्रवारी मरण पावलेल्या कोरोनाबाधित महिलेवर नांदेड येथील गोवर्धन घाट येथील स्मशानभूमित सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
——
प्रशासनाकडून अपूर्ण माहितीचा सपाटा सुरुच
जिल्हा प्रशासनाकडून कोरेानाची माहिती देताना टप्पे पाडले जात आहेत. सकाळी अपूर्ण माहिती दिली, की सायंकाळी प्रेसनोट काढायची, त्यात ही बर्याच वेळा माहिती पूर्णपणे मिळत नाही. कोरोनाबाधित महिला मरण पावली. मात्र त्या महिलेचे वय किती, कधी मृत्यू झाला, कधी रुग्णालयात भरती केले. स्वॅब कधी पॉझिटीव्ह आला, याबाबत प्रशासनाकडून माहिती दडविली जात आहे.







0 comments:
Post a Comment