जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

12 May 2020

बारडचा युवक कोरेाना पॉझिटीव्ह; रुग्ण संख्या 53

मुदखेड, :– मुंबई येथून रविवारी आलेल्या एक बाविस वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 53 इतकी झाली. ग्रामीण भागातून कोरोना पॉझिटीव्ह आलेला हा दुसरा रुग्ण आहे.

मुंबईमधील चिघळत चालेली परिस्थिती पाहून एका कुटुंबातील तरूण मुंबई येथून पायी गावाकडे निघाला होता. मंठा येथून वाहन मिळाल्यानंतर सर्व जण बारड येथे दोन दिवसांपूर्वी पोहचले. मात्र गावकर्‍यांनी सदरची माहिती पोलिसांसह आरोग्य प्रशासनाला दिली. यावरून त्यास कुटुंबास गावातील धर्मशाळेत क्वॉरंटाईन करून स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये 22 वर्षीय तरूणाचा अहवाल मंगळवार दि. 12 मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.

आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या हद्दीत होती. परंतु चार दिवसांपूर्वी माहूर येथील एक 60 वर्षीय इसम कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यानंतर मंगळवारी मुदखेड तालुक्यातील बारड येथे एक जण कोरोनाग्रस्त निघाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

0 comments:

Post a Comment