नांदेड:जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 457 जणांपैकी 482 व्यक्तींचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच 35 कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 304 जणांचा त्याच समावेश आहे. त्यातील 218 जणांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आलेले होते. त्या सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 35 इतकी झाली, असून यात चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अजून तीन कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बेपत्ता, असून 28 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सहा जण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर 22 जण हे पंजाब भवन कोविड केअर सेटर येथे उपचारार्थ आहे. उपचार घेणार्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थित असल्याचे डॉ. भोसीकर यांनी कळविले आहे.







0 comments:
Post a Comment