जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

09 May 2020

चार जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह; माहूर येथील एका रुग्णाचा समावेश

नांदेड,: – दिवसभराच्या काळात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 6 झाली, असून सकाळी दोन तर सायंकाळी चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. आतापर्यंत नांदेड शहरापुरती मर्यादीत असलेली रुग्णांची संख्या होती. मात्र सायंकाळच्या अहवालात माहूर मधील एका रुग्णाचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या 44 इतकी झाली आहे.

शनिवारी प्राप्त झालेल्या एकूण अहवालांपैकी चार जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये देगलूर नाका भागातील रहमत नगर येथील कोरोनामुळे मरण पावलेल्या 48 वर्षीय महिलेच्या संपर्कातील तीन जण आहेत. यामध्ये 32 वर्षीय महिला व चौदा वर्षांच्या दोन मुलांचा समावेश आहे.
तसेच माहूर येथील कोविड केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल असलेल्या एका 64 वर्षीय इसमाचा सुद्धा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 44 इतकी झाली, असून यापूर्वी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी दिली.

0 comments:

Post a Comment