जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

25 May 2020

55 वर्षीय रुग्णांने जीव सोडला;आणखी रुग्ण वाढले

नांदेड:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवार दि.25 मे रोजी नव्याने सहा रुग्णांची भर पडली आहे. तर एका 55 वर्षीस इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू तर कोरोनाग्रस्तांची संख्या 133 इतकी झाली आहे.

रविवारी रात्री प्राप्त झालेल्या शिवाजी नगरमधील एका व्यक्तीच्या कोरोनाच्या अहवालाने महाराष्ट्रात भुकंप उडवून दिला होता. या धक्यातून जिल्ह्यातील नागरिक सावरण्यापूर्वीच सोमवारी सायंकाळी सहा वाजता कोरेानाची प्रेसनोट प्रसिद्ध झाली. यामध्ये सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शहरातील मिलतनगर येथील 55 वर्षीस इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

तर पाच रुग्णांमध्ये इतवारा भागात 2 रुग्ण आढळले ते दोघे ही पुरुष असून ज्यांचे वय हे 27 व 32 वर्षे इतके आहे. आंनद कॉलनीमधील जिजामाता कॉलनीत राहणार्‍या 80 वर्षीय वृद्धास ही कोरोनाची लागण झाली आहे. माहुर तालुक्यातील वडगा येथील 17 वर्षांच्या बालक ही कोरोनाबाधित झाला, किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील 29 वर्षीय युवकाचा अहवाल ही कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.

सोमवारी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 63 झाली आहे. सध्या 63 जणांवर उपचार सुरु आहेत. 63 रुग्णांमध्ये 7 रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंजाब भवन व यात्री निवास येथे 45 रुग्ण, मुखेड ग्रामीण रुग्णालय 5, भोकर-1, बिलोली रुग्णालय-1 तर शिवाजी नगर व वैभव नगर येथील एक असे दोन रुग्णांवर मुंबई येथे उपचारास हलविण्यात आले आहे. तसेच एका 55 वर्षीस महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी सांगितले.

0 comments:

Post a Comment