जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

04 May 2020

नांदेडमध्ये आणखी 3 पॉझिटीव्ह;रुग्णसंख्या 34

नांदेड:- नांदेड शहरात मागच्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली, असून दिवसाकाठी काहींना स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह येत आहे. सोमवारी दि. 4 मे रोजी तिघा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले, असून शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 34 झाली, असून यापूर्वी तिघांचा मृत्यू झाला आहे.तर 31 जणांवर उपचार सुरु आहेत.

आरोग्य यंत्रणेकडून काही जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले होते. यामध्ये तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. हे तिघेजण गुरुव्दारा परिसरातील कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी शनिवारी वीस कर्मचार्‍यांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले होते. यातील चार जणांचा अद्याप पत्ता लागू शकलेला नाही.

सोमवारी आढळून आलेल्या तिघाही कर्मचार्‍यांना शहरातील शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात क्वॉरंटाईन करण्यात आले होते. अहवाल येताच त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आले. मागच्या तीन दिवसांच्या काळात गुरुव्दारा येथील कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची संख्या पंचविस झाली आहे. तर चालक व मदतनिसांची संख्या 7 इतकी आहे.

0 comments:

Post a Comment